हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात रोहित शर्मा यावर्षी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने रोहितकडे असलेले कर्णधारपद आगामी हंगामासाठी हार्दिक पंड्याच्या हातात दिले आहे. संघाला पाच वेळा आयपीएल चॅम्पियन बनवणाऱ्या रोहितला अशा प्रकारे कर्णधारपदावरून हटवणे चाहत्यांना पटले नाही. याच कारणास्तव हार्दिक पंड्या याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाल्या. पण हार्दिक याकडे दुर्लक्ष करतो, असे त्याने स्वतः सांगितले.
इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) हंगामाची सुरुवात 22 मार्च रोजी होत आहे. या हंगामात हार्दिक पंड्या (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सचा पूर्णवेळ कर्णधार असेल. मागच्या दोन आयपीएल हंगामांमध्ये हार्दिकच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सने एकदा विजेतेपद, तर एकदा उपविजेतेपद पटकावले. संघ व्यवस्थापनाने भविष्याचा विचार करून हार्दिकला मुंबईचा कर्णधार बनवले, असे सांगितले गेले. पण चाहत्यांना संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय जराही पटला नाही. सोशल मीडियावर रोहितच्या चाहत्यांकडून चांगलीच नाराजी व्यक्त केली गेली.
आयपीएलच्या बातम्यांसाठी आताच व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा!- इथे क्लिक करा
सोमवारी (18 मार्च) मुंबई इंडियन्सने पत्रकार परिषद घेतली. कर्णधार हार्दिक पंड्या आणि प्रशिक्षक मार्क बाउचर यासाठी उपस्थित होते. यावेळीच हार्दिक पंड्याला प्रश्न विचारला गेला की, रोहितच्या जागी मुंबई इंडियन्सचा कर्णधार तुला केल्यानंतर चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावरी होत असलेल्या टीकांकडे तू कशा पद्धतीने पाहतो. यावर हार्दिकने उत्तर दिले की, “मी चाहत्यांच्या भावनांचा आदर करतो. पण मी केवळ त्याच गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकतो, ज्या माझ्या नियंत्रणात आहेत. मी त्या गोष्टींकडे लक्षच देत नाही, ज्या माझ्या हातात नाहीत. मी त्यांचा (चाहत्यांचा) सन्मान करतो, पण माझे लक्ष्य यावरच असेल की संघासाठी काय चांगले करता येईल.”
दरम्यान, हार्दिक पंड्या तसा पाहिला, तर मुळचा मुंबई इंडियन्सचा खेळाडू आहे. 2015 मध्ये त्याने मुंबई इंडियन्सकडून आयपीएल पदार्पण केले. सात हंगामांमध्ये त्याने मुंबईचे प्रतिनिधित्व केले. पण आयपीएल 2022 पूर्वी मुंबई इंडियन्सने अष्टपैलू खेळाडूला रिलीज केले आणि तो गुजरात टायटन्समध्ये सामील जाला. गुजरातने आपल्या पहिल्याच आयपीएल हंगामात हार्दिककडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली आणि विजेतेपद पटकावले. तसेच मागच्या वर्षी देखील त्याच्या नेतृत्वात गुजरात संघ अंतिम सामन्यात येऊन पराभूत झाला. आता आगामी आयपीएल हंगामात हार्दिकच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघ कसे प्रदर्शन करतो हे पाहण्यासारखे असेल. त्याचसोबत हार्दिकच्या नेतृत्वात रोहितची भूमिका काय असणार, हीदेखील पाहण्यासारखी बाब असेल. (Hardik Pandya’s statement on fans who are emotional for Rohit Sharma)
महत्वाच्या बातम्या –
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! IPL 2024 पूर्वी विराट कोहलीनं सुरू केला सराव, व्हिडिओ व्हायरल
नाशिक संघावर मात देत सांगली संघ प्रमोशन फेरीत दाखल