भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. हरमनप्रीतने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात पंचांच्या निर्णायवर नाराजी व्यक्त केली होती. पंचांनी बाद दिल्यानंतर हरमनप्रीतने रागाच्या भरात स्टंप्सवर बॅट मारली आणि खेळपट्टी सोडताना पंचांशी वाद देखील घातला. याच पार्श्वभूनीवर तिच्यावर आयसीसीकडून मोठी कारवाई होणार, असे सांगितले जात आहे.
आयसीसी हरमनप्रीतवर एक कसोटी किंवा दोन मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी बंदी घालू शकते. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात दाखवलेला राग हरमनप्रीत कौर () हिला माहागात पडणार, असे दिसत आहे. हरमनप्रीतने या सामन्यात महत्वाच्या वेळी स्लिप्समध्ये झेल दिला आणि बाद झाली. मात्र, कर्णधाराच्या मते चेंडू हातातील ग्लवच्या आधी बॅडला लागला होता. पण पंचांनी दिला बाद दिले. याच कारणास्तव तिने जाना स्टंप्सवर बॅट मारली आणि पंचांशी गैरवर्तन केले. हरमनप्रीत एवढ्यावरच थांबली नाही. सामना संपल्यानंतर तीने पोस्ट मॅच प्रेजेंटेशनमध्येही याविषयी नाराजी व्यक्त केली. बांगलादेश संघ आणि कर्णधार निगार सुलताना हिचा अपमान देखील हरनप्रीतने केला.
भारतीय संघाच्या कर्णधाराकडून अशी वागणून अपेक्षित नसल्याचे चाहते आणि जाणकारांकडून बोलले जात आहे. आयसीसी देखील याविषयी कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. स्टंप्सवर बॅट मारण्यासाठी हरमनप्रीतला तीन डेमेरिट पॉइंट्स, तर पंचांशी गैरवर्तनासाठी एक डिमेरिट पॉइंट तिला मिळणार आहे. आयसीसीच्या नियमानुसार एखाद्या खेळाडूला 24 महिन्यांमध्ये 4 डिमेरीट पॉइंट्स मिळाले, तर त्यावर एक कसोटी किंवा दोन मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी बंदी आणली जाते. अशात हरमनप्रीत या लेवत 2च्या गुण्यास पात्र ठरताना दिसत आहे. दरम्यान, आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यात हरमनप्रीतवर होणाऱ्या कारवाईविषयी चर्चा सुरू असल्याच्या बोलले जात आहे.
फोटोशुटवेळी भिडले हरमनप्रीत आणि निगार सुलताना!
दरम्यान, उभय संघांतील तिसरा वनडे बरोबरीत सुटल्यानंतर विजेतेपद देखील दोन्ही संघांमध्ये विभागून घ्यावे लागले. दोन्ही संघ ट्रॉफीसोबत फोटो काढण्यासाठी आले असताना हरमनप्रीतकडून निगार सुलताना आणि संपूर्ण बांगलादेश संघाला ट्रोल करण्याचा प्रयत्न झाला. “तुम्ही एकटे आलात, पंचांना पण बोलवा. सामना बरोबरीत सोडवण्यासाठी पंचांची खूप मद झाली आहे,” अशे विधान यावेळी हरमनप्रीतने केल्याचे समोर येत आहे. भारतीय कर्णधाराच्या या वर्तनानंतर निगार सुलतानाने आपल्या संघासह ड्रेसिंग रुममध्ये परतण्याचा निर्णय घेतला. हा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.
Bangladesh-W captain & her team left the photo session after Indian-W captain Harmanpreet Kaur told them,
-“Why you are only here? You haven't tied the match. The umpires did it for you. Call them up! We better have photo with them as well.”BCB to notify BCCI & ICC soon. pic.twitter.com/PnyEQxoYuC
— SazzaDul Islam (@iam_sazzad) July 23, 2023
कधी होणार कारवाई?
भारतीय महिला संघाला पुढची मालिका सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायची आहे. ही मालिका वनडे स्वरूपातील असल्यामुळे मालिकेतील दोन सामन्यांना हरमनप्रीतला मुकावे लागू शकते. पण यासाठी आससीसीला आधी आपला निर्णय जाहीर करावा लागेल आणि नंतरच तिच्यावरील कारवाई निश्चित मानता येईल. आयसीसीकडून कारवाई झाली, तर हरमनप्रीत लेवल दोनचा गुन्हा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू असेल. (Harmanpreet may be banned for the upcoming match for misconduct in the ODI against Bangladesh)
महत्वाच्या बातम्या –
देवधर ट्रॉफीच्या पहिल्या दिवशी पश्चिम विभाग-दक्षिण विभागाचे दणदणीत विजय, रिंकू चमकला
वेस्ट इंडीजमध्ये टीम इंडियाचा दरारा! तब्बल 21 वर्षापासून कॅरेबियन भूमीवर अजिंक्य