Heinrich Klaasen Test Retirement: दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गर याने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळली, जी त्याची शेवटची मालिका होती. यानंतर आता दक्षिण आफ्रिकेच्या आणखी एका खेळाडूने कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून यष्टिरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेन आहे, जो गेल्या वर्षी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. मात्र, क्लासेनने त्याच्या कारकिर्दीत केवळ 4 कसोटी सामने खेळले आहेत.
2019 ते 2023 दरम्यान दक्षिण आफ्रिकेसाठी चार सामने खेळल्यानंतर 32 वर्षीय हेनरिक क्लासेन (Heinrich Klaasen) याला लाल चेंडूच्या फॉर्मेटमधून बाजूला करण्यात आले आहे. भारतातच खेळलेल्या भारताविरुद्धच्या मालिकेतून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने ऑस्ट्रेलियात देशाचे प्रतिनिधित्व केले आणि गेल्या उन्हाळी हंगामात तो वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामने खेळला. मात्र, या सामन्यांमध्ये त्याची कामगिरी चांगली झाली नाही आणि त्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघातून वगळण्यात आले.
हेनरिक क्लासेनला रेड बॉल क्रिकेटचा अनुभव नाही असे नाही. त्याने 85 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 46 पेक्षा जास्त सरासरीने एकूण 5347 धावा केल्या आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 12 शतके झळकावली आहेत. या फॉरमॅटमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 292 धावा आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला त्याच्या निवृत्तीबद्दल सांगताना क्लासेन म्हणाला की, अनेक रात्री विचार केल्यानंतर मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी या निष्कर्षा पर्यंत पोहोचला आहे.
तो म्हणाला, “मी योग्य निर्णय घेत आहे की नाही या विचारात काही रात्री घालवल्यानंतर मी लाल चेंडूच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मी घेतला आहे, कारण हा माझा खेळाचा सर्वात आवडता प्रकार आहे. मी मैदानावर आणि मैदानाबाहेर ज्या लढायांचा सामना केला त्यामुळे मी आजचा क्रिकेटपटू बनलो आहे. हा प्रवास खूप चांगला आहे आणि मला आनंद आहे की, मी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करू शकलो आहे.” (Hasty retirement of African player from Test cricket played only 4 matches in career)
हेही वाचा
Viral Video: जेव्हा तुमचा दिवस नसतो तेव्हा… पाहा क्रिकेटरचा ‘हा’ दुर्दैवी व्हिडीओ
Ball Tampering: भारताच्या दिग्गज गोलंदाजाची कबूली! पुर्वी सगळेच बॅाल कुरतडायचे, ‘पण पाकिस्तानी…’