चेन्नईमध्ये १८ फेब्रुवारी रोजी इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाचा लिलाव पार पडला. या लिलावादरम्यान अनेक आश्चर्यकारक निर्णय संघांनी घेतलेले दिसले. तसेच अनेक परदेशी खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लावली गेली. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलवर १४.२५ कोटी रुपयांची बोली लावत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतला. आता, एका मुलाखतीत बोलताना मॅक्सवेलने, आपण विराटसोबत खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.
विराट कोहली अव्वल दर्जाचा खेळाडू
ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या संघाचा नियमित सदस्य असलेल्या मॅक्सवेलवर १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या आयपीएल लिलावावेळी विराट कोहली कर्णधार असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने १४.२५ कोटी रुपयांची बोली लावली. ऑस्ट्रेलियातील एका अग्रणी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मॅक्सवेलने विराटचे कौतुक केले.
तो म्हणाला, “गेल्या काही वर्षापासून विराट तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अव्वल दर्जाचा खेळ दाखवत आहे. तो परिस्थितीनुसार आपल्या खेळामध्ये बदल करतो. त्याच्या नेतृत्वात खेळणे एक वेगळा अनुभव असेल. यादरम्यान त्याच्याकडून नेतृत्वातील बारकावे शिकण्यास मिळतील. फक्त सामन्यातच नाहीतर सरावात ही तो कशाप्रकारे मेहनत घेतो हे पाहायला मला आवडेल. तो माझा चांगला मित्र आहे.”
मागील आयपीएल हंगामात राहिला होता फ्लॉप
मागील वर्षी आयपीएलवेळी मॅक्सवेलने किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्या हंगामात १३ सामने खेळताना तो फक्त १०८ धावा काढू शकला होता. विशेष म्हणजे यामध्ये एकाही षटकारांचा समावेश नव्हता. या खराब कामगिरीनंतर पंजाब संघाने त्याला करारमुक्त केले होते. आयपीएल लिलावाआधी त्याने आरसीबीकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर, प्रत्यक्ष लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ व्यवस्थापनाने राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद व चेन्नई सुपर किंग्स या संघांना पछाडत १४.२५ कोटी रुपयांच्या मोठ्या बोलीवर त्याला आपल्या संघात सामील करून घेतले.
महत्वाच्या बातम्या:
विकेट घेताच दिसले मोहम्मद आमिरचे रागीट रूप, पाहा आक्रमक सेलिब्रेशनचा व्हिडिओ
विराटने बाहेर केलेल्या खेळाडूने मिळवून दिला रोमहर्षक विजय, ९ चेंडूत पालटला सामन्याचा नूर
Video: पाकिस्तानी गोलंदाजाला धू धू धुतला! एका षटकात फिरला सामना, दिल्या तब्बल २० धावा