पाकिस्तानमध्ये सध्या टी-२० लीगचा थरार सुरु आहे. पाकिस्तान सुपर लीग या स्पर्धेत अनेक अव्वल खेळाडू सहभागी झाले असून चाहत्यांना दर्जेदार मुकाबले पहावयास मिळत आहेत. या स्पर्धेत कराची किंग्ज आणि लाहोर कलंदर्स या संघात असाच एक रोमहर्षक सामना खेळवल्या गेला. मात्र या सामन्यातील एका घटनेने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
चाहत्यांनी केले प्रोत्साहित
कराची किंग्ज आणि लाहोर कलंदर्स यांच्यातील सामन्यात कराचीच्या संघाकडून खेळत होता. या सामन्यात त्याच्या संघाकडून तो पहिले षटक टाकत होता. या षटकाच्या चौथ्याच चेंडूवर लाहोरच्या संघाचा सलामीवीर सोहेल अख्तर रन आउट होऊन माघारी परतला होता. त्यामुळे कराची संघात उत्साह निर्माण झाला होता.
याच वातावरणाचा फायदा घेऊ पाहत गोलंदाजी करत असलेल्या मोहम्मद आमिरने पाचवा चेंडू टाकण्यासाठी धाव घेण्यापूर्वी सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांना उद्देशून इशारा केला. प्रेक्षकांनी अधिक जल्लोष करत पाठिंबा द्यावा, असा त्याच्या इशाऱ्याचा अर्थ होता. प्रेक्षकांनीही त्याला प्रतिसाद देत कराची संघाचा उत्साह वाढवण्यास सुरुवात केली.
मोहम्मद आमिरचे आक्रमक सेलिब्रेशन
विशेष म्हणजे प्रेक्षकांच्या या प्रोत्साहनाने प्रेरित होत मोहम्मद आमिरने त्या चेंडूवर लाहोरच्या संघाचा फलंदाज जो डेन्लीला पहिल्याच चेंडूवर बोल्ड केले. या विकेटनंतर खुश झालेल्या आमिरने अतिशय आक्रमक सेलिब्रेशन देखील केले. काहीशा रागात आनंद साजरा करत असलेला आमिर बराच काळ त्याला थांबवू पाहत असलेल्या संघ सहकाऱ्यांच्याही हाती सापडला नाही.
This is what it means to have fans in the stands!
A truly magical moment between the NSK crowd and @iamamirofficial #HBLPSL6 | #MatchDikhao | #KKvLQ pic.twitter.com/Cbd4aLJ4bZ
— PakistanSuperLeague (@thePSLt20) February 28, 2021
मात्र आमिरचा हा आनंद फार काळ टिकला नाही. त्याच्या संघाला या सामन्यात पराभव पत्करावा लागला. इतकेच नाही तर मोहम्मद आमिरने स्वतःच १९व्या षटकात २० धावा दिल्या. आमिरच्या या महागड्या षटकामुळे सामना पूर्णतः लाहोरच्या पारड्यात गेला होता. डेविड विजेने अखेरच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूवरच १० धावा घेत संघाला विजयी केले.
महत्वाच्या बातम्या:
विराटने बाहेर केलेल्या खेळाडूने मिळवून दिला रोमहर्षक विजय, ९ चेंडूत पालटला सामन्याचा नूर
Video: पाकिस्तानी गोलंदाजाला धू धू धुतला! एका षटकात फिरला सामना, दिल्या तब्बल २० धावा