History was made at Lord’s: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा 3 दिवसांचा खेळ संपला असून, इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात झाली आहे. पहिल्या डावातील खेळानंतरही असे वाटत आहे की, लॉर्ड्स कसोटीची खरी सुरुवात चौथ्या दिवशी झाली आहे. भारत-इंग्लंड कसोटी सामन्यात असे काही घडले आहे, जे 147 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ 9 वेळाच झाले आहे. भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांची पहिली इनिंग बरोबरीच्या धावसंख्येवर संपली आहे. (Lord’s Test history)
भारत-इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीत दोन्ही संघ पहिल्या डावात 387 धावांवर ऑलआउट झाले. कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात असे घडण्याची ही 9 वी वेळ आहे.
1910 मध्ये डर्बन येथे दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात असे पहिल्यांदा घडले होते, जेव्हा दोन्ही संघांनी 199 धावा केल्या होत्या.
1994 मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात जे घडले, त्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. या कसोटीच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजला 593 धावांचे विशाल लक्ष्य मिळाले होते, तर इंग्लंडनेही या सामन्यात 593 धावाच केल्या. हा कोणत्याही कसोटी सामन्यातील पहिल्या डावातील सर्वात मोठा बरोबरीचा स्कोअर आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात अशी घटना यापूर्वीही घडली आहे. 1986 मध्ये बर्मिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात दोन्ही संघांनी पहिल्या डावात 390 धावा केल्या होत्या आणि तो सामना ड्रॉ झाला होता.
लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडसाठी पहिल्या डावात अनुभवी खेळाडू जो रूटने शानदार शतक झळकावले आणि 199 चेंडूत 104 धावांची खेळी केली. (Joe Root century Lord’s) तर, जेमी स्मिथ आणि ब्रायडन कार्सच्या अर्धशतकांच्या बळावर इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 387 धावांवर ऑल आउट झाला. लॉर्ड्स कसोटीत जेव्हा भारताचा संघ फलंदाजीला आला, तेव्हा भारतानेही पहिल्या डावात 387 धावा केल्या. भारतासाठी केएल राहुलने शानदार 100 धावा केल्या. (KL Rahul century Lord’s) तर, रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा दोन्ही फलंदाजांनी शानदार अर्धशतकी खेळी केली. (Rishabh Pant Ravindra Jadeja fifty)






