हॉकी आशिया कप 2025 बिहारच्या राजगीर येथे खेळवला जात आहे. या स्पर्धेत भारताने चीनला 7-0 अशा मोठ्या फरकाने पराभूत करत अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. भारतीय खेळाडूंनी 7 गोल केले, तर चीनकडून एकही गोल करण्यात आला नाही. आता 7 सप्टेंबरला भारताचा अंतिम सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे तो
चीनविरुद्ध भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत सलग गोलच्या संधी निर्माण केल्या. सर्वप्रथम साहिलानंद लाकडाने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दिलप्रीत सिंग यानेही गोल करत भारताला 2-0 अशी आघाडी दिली. पहिल्या क्वार्टरमध्येच भारताने दोन गोल नोंदवले आणि चीनचा बचाव पूर्णपणे खिळखिळा केला.
दुसऱ्या क्वार्टरमध्येही चीन दडपणाखाली खेळला. मनदीप सिंगने पेनाल्टी कॉर्नरवरून अप्रतिम गोल करत चीनच्या पुनरागमनाची शक्यता संपवली. हाफ-टाईमपर्यंत भारताने 3-0 अशी भक्कम आघाडी घेतली होती.
𝑨 𝒅𝒊𝒔𝒑𝒍𝒂𝒚 𝒐𝒇 𝒔𝒉𝒆𝒆𝒓 𝒅𝒐𝒎𝒊𝒏𝒂𝒏𝒄𝒆! 🔥
— Hockey India (@TheHockeyIndia) September 6, 2025
India controlled the game throughout with authority and precision against China. 🇮🇳#HockeyIndia #IndiaKaGame #HumseHaiHockey #HeroAsiaCupRajgir pic.twitter.com/VxQlHe30ET
यानंतर भारताकडून राजपाल कुमार आणि सुखजीत सिंग यांनी गोल नोंदवले. सुखजीतने पेनाल्टी कॉर्नरवरून गोल करून चीनच्या गोलकीपरला चकवले. चौथ्या क्वार्टरमध्ये अभिषेकने दोन गोल (45व्या आणि 49व्या मिनिटाला) केले आणि भारताचा विजय पक्का केला.
हॉकी आशिया कपच्या इतिहासात दक्षिण कोरिया सर्वात यशस्वी ठरला आहे. त्यांनी आतापर्यंत 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे. भारतीय संघाने 3 वेळा हा किताब जिंकला आहे. आता 7 सप्टेंबरला भारतासमोर कोरियाची मोठी कसोटी असणार आहे. या अंतिम सामन्यात विजय मिळवणारा संघ हॉकी वर्ल्ड कप 2026 साठी पात्र ठरेल.






