भारतीय क्रिकेटमध्ये निवृत्तीची प्रक्रिया ही साधारणत: २ प्रकारची असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. एक म्हणजे, खेळाडू योग्य वेळेनुसार आपल्या निवृत्तीची घोषणा करतो. तर दुसरी म्हणजे, खेळाडू आपल्या निवृत्तीबाबतचा निर्णय घेण्यासाठी वेळ घेताना दिसतात.
भारताचे दिग्गज क्रिकेटपटू विजय मर्चंट यांनी म्हटले होते की, “खेळाडूने आपल्या निवृत्तीबाबत नेहमी सतर्क राहिले पाहिजे. खेळाडूने त्यावेळी निवृत्ती घेतली पाहिजे जेव्हा लोक ‘आता का’ असे म्हणतील. ना की तेव्हा जेव्हा लोक ‘कधी’ असे विचारु लागतील.
सुनील गावसकर –
भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना त्यांच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखले जाते. गावसकर यांनी त्यांच्या निवृत्तीची घोषणाही स्वत:ला योग्य वाटले त्या वेळी घेतली होती. वयाच्या ३७व्या वर्षी म्हणजेच १९८७ मध्ये गावसकर यांनी त्यांचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
यावेळी पाकिस्तान विरुद्धच्या कारकिर्दीच्या शेवटच्या सामन्यात गावसकरांनी ९६ धावांची खेळी केली होती. त्यांच्यामध्ये १९८९च्या पाकिस्तान दौऱ्यामद्येही उत्कृष्ट खेळण्याची क्षमता होती. मात्र, आपल्या चांगल्या प्रदर्शनाव्यतिरिक्तही त्यांना खेळाचा आनंद लुटता येत नव्हता. म्हणून त्यांनी १९८७मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.
कपिल देव –
भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू त्यांच्या निवृत्तीच्या निर्णयाचा निर्णय संघर्ष करताना दिसले. १९९१च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कपिल यांच्या प्रदर्शनावर त्यांच्या वयाचा पडसाद स्पष्टपणे दिसत होता. त्यावेळी त्यांच्या हालचाली जरा मंदावल्या होत्या. त्यामुळे तत्कालिन संघाचे कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन हे कपिल यांच्या काही षटकानंतर संघातील इतर गोलंदाजांना चेंडू देत असत.
महत्त्वाचे म्हणजे, कपिल भारतीय संघाचा भाग असल्यामुळे त्यावेळचा उत्कृष्ट वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ याला ३ वर्षे संघात स्थान मिळाले नव्हते. अखेर १९९४मध्ये कपिल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
सौरव गांगुली –
भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची क्रिकेट कारकिर्द दमदार होती. २००८मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर गांगुलीने स्वत: त्याच्या निवृत्तीची घोषणा केली होती. कारण त्याची अशी इच्छा नव्हती की, संघ निवडकर्त्यांनी परत त्याला संघातून बाहेर काढावे.
राहुल द्रविड –
धोनीच्या सल्ल्यानुसार, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली या सिनियर खेळाडूंना भारतीय संघातून बाहेर काढल्याचे म्हटले जात होते. मात्र, द्रविडने त्याच्या कसोटीतील दमदार प्रदर्शनाच्या जोरावर २०११मध्ये इग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय वनडे संघात स्थान मिळवले होते. असे असले तरी, त्याने ही त्याची शेवटची वनडे मालिका असेल, अशी घोषणा केली होती. त्यानंतर ६ महिन्यांनी द्रविडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यातील खराब प्रदर्शनानंतर कसोटीतूनही निवृत्तीची घोषणा केली.
सचिन तेंडुलकर –
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या शेवटी शतक बनवता येत नव्हते. मात्र, त्याच्या धावांनाही ओहोटी लागली होती. तरी, अखेर सचिनने नोव्हेंबर २०१३मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यासाठी वानखेडे स्टेडियमवर खास कसोटी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.
विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर –
विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर हे त्या खेळाडूंपैकी एक होते, ज्यांना हे समजायला थोडा वेळ लागला की त्यांचे भारतीय संघातील स्थान संपुष्ठात आले आहे. असे असले तरी, सेहवागने २०१५मध्ये आणि गंभीरने २०१८मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यांना फेअरवेल सामना खेळायला मिळाला नाही.
एमएस धोनी –
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी निवृत्तीच्या दुसऱ्या प्रक्रियेमध्ये मोडतो. त्याने जुलै २०१९च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत आपला शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर आता जवळपास १० महिने झाले तरीही धोनी क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसला नाही. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधान आलेले आहे.
असे असले तरी, धोनीने अद्यापही त्याच्या निवृत्तीबाबत काहीही सांगितलेले नाही. तसेच तो सध्या कसून सराव करताना दिसत आहे.
ट्रेंडिंग लेख-
१० कोटी रुपये मिळूनही आयपीएलमध्ये सुपर डुपर फ्लाॅप ठरलेले ३ भारतीय खेळाडू
क्रिकेट जगतातील ४ ‘असे’ प्रसंग जिथे स्वत: क्रिकेटपटूंनी…
टीम इंडियासाठी अक्षरश: जीवाचं रान केलेल्या ‘या’ ३…