---Advertisement---

वडिल गेल्यावर गुरुजींनी वाढवला सिराजचा आत्मविश्वास; म्हणाले, ‘बापाचे आशिर्वाद सोबत आहेत, तू…’

On: गुरूवार, जून 3, 2021 5:15 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सध्या संघातील नियमित सदस्य बनला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेत त्याने शानदार कामगिरी करून वाहवा मिळवली होती. याच दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी सिराजच्या वडिलांचे निधन झालेले. त्यानंतर, भारतात परतण्याऐवजी ऑस्ट्रेलियात राहून राष्ट्रहिताला प्राधान्य दिले. या कठीण काळात संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपल्याला कशा प्रकारे मदत केली याचा उलगडा सिराजने नुकताच एका मुलाखतीत केला.

रवी शास्त्री यांची झाली अशी मदत
आयपीएल २०२० मध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर सिराजची निवड ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी झाली होती. मात्र, ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर हैदराबाद येथे त्याच्या वडिलांचे निधन झाले. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत वडिलांनी अपार कष्ट करत त्याला क्रिकेटपटू बनवले होते. या दुःखद समयीदेखील सिराजने भारतात परतण्याऐवजी ऑस्ट्रेलियात राहून देशासाठी खेळण्याचे ठरवले.

या घटनेनंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपल्याला कसे प्रोत्साहित केले याबाबतचा खुलासा सिराजने नुकताच एका मुलाखतीत केला. तो म्हणाला, “वडिलांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर रवी सर आणि गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण माझ्याकडे आले. त्यांनी मला सांगितले की, तू कसोटी खेळ. तुझ्या वडिलांचे आशीर्वाद तुझ्यासोबत असणार आहेत. तु सामन्यात पाच बळी घेऊ शकतोस. पहिल्या सामन्यात मी खरोखरच पाच बळी मिळवले. रवी सर माझ्या कामगिरीने खूप आनंदित झालेले.”

सिराजने यापूर्वी वडिलांच्या निधनानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपल्याला कशाप्रकारे प्रोत्साहित केले होते, याविषयी देखील खुलासा केला होता.

शानदार फॉर्ममध्ये आहे सिराज
ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या कामगिरीने प्रभावित केल्यानंतर इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेत देखील सिराज चमकला. तसेच सध्या, कोरोनामूळे स्थगित करण्यात आलेल्या आयपीएलमध्ये ही त्याने आरसीबीसाठी अप्रतिम कामगिरी केली होती. याच कामगिरीमुळे त्याचा समावेश जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी तसेच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ फलंदाजाच नादच खुळा, कसोटीत १० हजार धावा करणाऱ्या गावसकरांना करायचीय त्याच्यासारखी फलंदाजी

ऐकलंच पाहिजे! ‘किंग’ कोहली अन् ‘कोच’ शास्त्रींमधील संवादाचा ‘तो’ ऑडिओ लीक; इंटरनेटवर जोरदार व्हायरल

‘अरे त्या बाळाचा श्वास कोंडला जात असेल’, विरुष्कासह वामिकाचे फोटो काढल्यामुळे चाहत्यांचा संताप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---