---Advertisement---

“माझी तुलना तीही रोहित शर्माशी…”, युवा पाकिस्तानी क्रिकेटरने केले मोठे वक्तव्य

---Advertisement---

कराची । भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर आणि धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा याचे चाहते जगभर आहेत. आपल्या फलंदाजीने तो सर्वांचीच मने जिंकतो. केवळ क्रिकेटप्रेमीच नाही, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील काही क्रिकेटपटूही त्याचे चाहते आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाचा युवा फलंदाज हैदर अली हा सुद्धा रोहित शर्माचा चाहता आहे. चाहत्यांनी त्याची तुलना रोहितशी केली होती.

रोहितशी केलेल्या तुलनेवर हैदर म्हणाला की, त्याच्यासारखे खेळण्याची इच्छा आहे पण या अनुभवी खेळाडूशी तुलना केल्यामुळे अस्वस्थ वाटते. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौर्‍यावर हैदरने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि अर्धशतक ठोकले.

रोहितबद्दल बोलताना हैदर म्हणाला की, “रोहित हा एक अतिशय चांगला खेळाडू आहे आणि त्याच्याशी माझी तुलना होऊच शकत नाही. मला वरच्या फळीतील फलंदाज म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे.”

पुढे बोलताना हैदर म्हणाला, “रोहित हा सलामीवीर आहे आणि जेव्हा कोणी माझी तुलना त्याच्याशी करतो, तेव्हा मला अस्वस्थ वाटते. आमची तुलना मुळीच होऊ शकत नाही. कारण तो एक महान फलंदाज आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिलेले योगदान खूप मोठे आहे.”

या 20 वर्षीय फलंदाजाने सांगितले की, तो काही दिग्गज फलंदाजांचे व्हिडिओ पाहून क्रिकेट शकला. रोहितची फलंदाजी पाहायला त्याला फार आवडते.

हैदरने पदार्पणातच टी20 सामन्यात इंग्लंडविरुद्ध 54 धावांची खेळी केली होती. त्याने या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार ठोकले होते. त्याच्या या खेळीने सर्वांनाच प्रभावित केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

-विराटने धोनीची घेतलेली गळाभेट पाहून चाहत्यांनाही झाला आनंद, पाहा व्हिडिओ

-आला रे! हैदाराबादविरुद्धच्या सामन्यातून राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचे पुनरागमन 

-महिला आयपीएल: बीसीसीआयने घोषित केले वेळापत्रक आणि संघ; पाहा कोणाला मिळाली कर्णधारपदी संधी

ट्रेंडिंग लेख-

-‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज

-फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा

-आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---