---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत अंतिम निर्णय लवकरच, आयसीसीचे नवे अध्यक्ष जय शाह यांची काही तासांत महत्वाची बैठक

On: गुरूवार, डिसेंबर 5, 2024 9:36 AM
---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफीवर अनेक दिवसांपासून टांगती तलवार आहे. टीम इंडिया या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा दौरा करणार नाही. या भूमिकेवर बीसीसीआय ठाम आहे. त्यामुळे भारत हायब्रीड मॉडेल अंतर्गत स्पर्धेत सहभागी होणार आहे. आता चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम निर्णय गुरुवार आज म्हणजेच (5 डिसेंबरला) येण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार आयसीसीचे नवे अध्यक्ष जय शाह आज महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. या बैठकीत सर्व क्रिकेट बोर्ड सहभागी होऊ शकतात. जय शाह (आयसीसी चेअरमन) यांच्या नेतृत्वाखाली आयसीसीची ही पहिलीच बैठक असेल. आजच्या बैठकीत चॅम्पियन्स ट्रॉफीचा निर्णय होईल की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी अपेक्षित आहे.

मात्र, आजच्या बैठकीतून चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक तयार केले जाऊ शकते. असा दावाही काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. सध्या या सर्व प्रकाराबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता आजच्या बैठकीत स्पर्धेबाबत काय निर्णय होतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून असे दिसून येते की, पाकिस्तान हायब्रीड मॉडेल स्वीकारण्यास तयार आहे. मात्र, पाकिस्तानच्या हायब्रीड मॉडेलमध्ये काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. पाकिस्तानकडून असे सांगण्यात आले की या मॉडेल अंतर्गत फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या आयसीसी स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जातील. पाकिस्तानचा संघही आयसीसी स्पर्धेसाठी भारत दौऱ्यावर जाणार नाही.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी म्हणाले होते, “एकतर्फी वाद स्वीकारला जाणार नाही. असे होऊ शकत नाही की आम्ही भारतात जात राहिलो, पण ते (भारत) मात्र पाकिस्तानात येत नाहीत. काहीही ठरले तरी ते समानतेच्या आधारावर व्हायला हवे.”

हेही वाचा-

वयाच्या 22 व्या वर्षी क्रिकेटला अलविदा, आता हा भारतीय क्रिकेटर झाला 70 हजार कोटी रुपयांचा मालक
“त्यानं पाचव्या किंवा ….” , ॲडलेड कसोटीपूर्वी माजी प्रशिक्षकानं रोहित शर्माला दिला सल्ला
HOCKEY; पाकिस्तानचा धोबीपछाड, भारताने ‘ज्युनियर आशिया कप’ मध्ये सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---