भारतात खेळल्या जात असलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत आतापर्यंत 13 सामने खेळले गेले आहेत. स्पर्धेतील 13वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअम येथे इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान संघात पार पडला. या सामन्यात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. गतविजेत्या इंग्लंड संघाला अफगाणिस्तानकडून 69 धावांनी दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे विश्वचषक 2023 पॉईंट्स टेबलमध्येही मोठा फेरबदल पाहायला मिळाला. 285 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव 215 धावांवरच संपुष्टात आला. इंग्लंडच्या पराभवामुळे पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया संघ तळात पोहोचला.
अफगाणिस्तान ‘या’ स्थानी
वनडे विश्वचषक (ODI World Cup) स्पर्धेच्या इतिहासातील अफगाणिस्तानचा हा दुसराच विजय आहे. इंग्लंडला पराभूत करत 2 गुणांच्या जोरावर पॉईंट्स टेबलमध्ये त्यांनी सहावे स्थान मिळवले आहे. तसेच, पाच वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया संघ पहिल्यांदाच 10व्या स्थानी गेला.
विश्वचषकाच्या आतापर्यंतच्या सर्व हंगामात असे पहिल्यांदाच घडले, जेव्हा ऑस्ट्रेलिया संघ पॉईंट्स टेबलमध्ये सर्वात खालच्या स्थानी पोहोचला. इंग्लंड संघ या यादीत 2 गुणांसह पाचव्या स्थानी आहे. त्यांचा नेट रनरेट -0.084 इतका आहे. तसेच, ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत खेळलेल्या 2 सामन्यात पराभव पत्करल्यामुळे त्यांचा नेट रनरेटही -1.846 झाला आहे.
England lost the game to see Australia at the bottom of the points table. pic.twitter.com/bCVkLamnBm
— Silly Point (@FarziCricketer) October 15, 2023
भारतीय संघ अव्वलस्थानी, तर न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिकाही मजबूत स्थितीत
पॉईंट्स टेबलमध्ये इतर संघांची स्थिती पाहिली, तर भारतीय संघ आपल्या तिन्ही सामन्यात मोठा विजय मिळवत अव्वलस्थानी विराजमान आहे. तसेच, 6 गुणांसह न्यूझीलंड दुसऱ्या स्थानी, तर दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानी आहे. आफ्रिकेने आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यात दमदार प्रदर्शन केले आहे. चौथ्या स्थानी पाकिस्तान संघ असून त्यांनी तीनपैकी 2 सामने जिंकले आहेत. तसेच, 3 सामन्यात 1 विजय मिळवणारा बांगलादेश संघ सातव्या, तर श्रीलंका आणि नेदरलँड्स संघ अनुक्रमे आठव्या आणि नवव्या स्थानी आहेत. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यीत पराभवाचा सामना केला आहे. (icc odi world cup 2023 points table after eng vs afg 13th match check other teams positions 2023)
हेही वाचा-
बलाढ्य इंग्लंडच्या नांग्या ठेचल्यानंतर अफगाणी कर्णधाराची जबरदस्त प्रतिक्रिया; म्हणाला, ‘हा विजय सर्वात…’
पराभवानंतर खचला बटलर, आपल्या सोडून अफगाणिस्तानच्या खेळाडूंचे गायले गुणगान; म्हणाला, ‘दु:ख झालंच पाहिजे…’