यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) भारतानं सलग 3 सामनं जिंकून सुपर 8 मध्ये त्यांची जागा पक्की केली. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतानं चमकदार कामगिरी केली आहे. तत्पूर्वी भारत विरुद्ध कॅनडा यांच्यामध्ये (15 जून) रोजी खेळल्या जाणाऱ्या सामन्यात कर्णधार राहित शर्माला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. याआधी कोणताही फलंदाज हा विक्रम करु शकला नाही.
कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 194 षटकार ठोकलं आहेत. त्याला 200 षटकार पूर्ण करण्यासाठी सहा षटकारांची गरज आहे. जर रोहित सहा षटकार ठोकण्यात यशस्वी झाला, तर तो टी20 क्रिकेटमध्ये 200 षटकार ठोकणारा जगातील पहिला फलंदाज बनेल. रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा जगातील एकमेव फलंदाज आहे.
रोहितनं आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीत आतापर्यंत 154 सामन्यात 194 षटकार ठोकलं आहेत. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या यादीत दुसऱ्या नंबरला न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल (Martin Guptill) आहे. त्यानं 122 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 173 षटकार ठोकलं आहेत. तर तिसऱ्या स्थानावर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) आहे. त्यानं 119 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 130 षटकार ठोकलं आहेत.
रोहितनं त्याच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीमध्ये 262 सामन्यात 323 षटकार मारले आहेत. तर आंतरराष्ट्रीय 59 कसोटी सामन्यात त्यानं 84 षटकार लगावले आहेत. रोहितनं त्याच्या टी20 कारकिर्दीमध्ये 443 सामन्यात 514 षटकार ठोकलं आहेत. टी20 कारकिर्दीमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत वेस्ट इंडिज संघाचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेल (Chris Gayle) शीर्ष स्थानी आहे. त्यानं 463 सामन्यात 1056 षटकार ठोकलं आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“उमर अकमलचे आकडे विराट कोहलीपेक्षा चांगले आहेत”, पाकिस्तानच्या माजी फलंदाजानं तोडले अकलेचे तारे
सुपर-8 मध्ये पोहचताच अफगाणिस्तानला धक्का, संघाचा स्टार फिरकीपटू दुखापतीमुळे विश्वचषकाबाहेर
टी20 विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच बनला ‘हा’ अनोखा रेकॉर्ड!