सध्या दक्षिण आफ्रिकेत आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळली जात आहे. भारतीय संघाकडे सोमवारी (20 फेब्रुवारी) थेट विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पोहोचण्याची संधी आहे. भारताला ग्रुप स्टेजचा हा शेवटचा सामना आयर्लंड संघाविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना जिंकला तर भारत उपांत्य सामन्यात जाईल आणि समना गमावल्यानंतर मात्र विश्वचषकातील संघाचे आव्हान संपुष्टात येईल.
भारत विरुद्ध आयर्लंड (India Women vs Ireland Women) यांच्यातील हा सामना सोमवारी सायंकाळी 6.30 मिनिटांनी सुरू होईल. आयर्लंड संघाने ग्रुपस स्टेजमधील त्यांचे सुरुवातीचे तीन सामने मगावले आहेत आणि संघ स्पर्धेतून बाहेर देखील पडला आहे. असे असले तरी त्यांनी शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडीज महिला संघाचा चांगलाच घाम काढला. अशात भारतीय महिला खेळाडू देखील आयर्लंडला हलक्यात गेण्याची चूक करणार नाही, असेच दिसते. कर्णधार हमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) या निर्णायक सामन्यासाठी कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात येणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. चला तर जाणून गेऊया महिला टी-20 विश्वचषकाच्या या महत्वाच्या सामन्याविषयी.
हरमनप्रीत कौर या टी-20 विश्वचषकात भारताच्या सर्वोत्तम 11 महिला खेळाडूंसह मैदानात उतरताना दिसली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात स्मृती मंधाना दुखापतग्रस्त असल्यामुळे यस्तिका भाटिया हिला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली होती. पण स्मृती फिट झाल्यानंतर यस्तिकाला पुन्हा बाकावर बसावे लागले. इंग्लंडविरुद्ध शेवटचा सामना खेळण्यासाठी जेव्हा भारतीय संघ मैदानात आला, तेव्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये एकही बदल पाहायला मिळाला नाही. अशात आयर्लंडविरुद्धच्या शेवटच्या ग्रुप स्टेज सामन्यात देखील संघ व्यवस्थापन प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणार नाही, अशीच अपेक्षा वर्तवली जात आहे.
इंग्लंडविरुद्ध खेळताना भारतीय संघाचे प्रदर्शन अप्रतिम राहिले, पण नेट सायवर हिच्या एकटीच्या जोरावर इंग्लंडने हा सामना 5 विकेट्सच्या अंतराने जिंकला. भारतासाठी वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूर चमकदार कामगिरी करू शकली. रेणुकाने या सामन्यात 5 विकेट्स घेतल्या. तसेच फलंदाजी क्रमातील स्मृती मंधाना आणि रिचा घोष यांची चांगली खेळी केली होती. रिचा घोष या विश्वचषक स्पर्धेत अजून एकदाही बाद झाली नाहीये.
भारतीय संघाची संभावित प्लेइंग इलेव्हन –
शेफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), देविका वैद्य, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग ठाकुर.
(India Women’s Probable Playing XI for the match against Ireland)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“भारतीय संघ खूप नशीबवान आहे कारण…”, राहुल द्रविड यांचे मोठे वक्तव्य
‘या’ दोन कारणांमुळे दिल्लीतही ऑस्ट्रेलियाने गमावला सामना, चूक फलंदाजांचीच!