पाच सामने खेळून त्यापैकी 4 सामन्यात पराभूत होणाऱ्या 4 संघांमध्ये गतविजेत्या इंग्लंड संघाचाही समावेश आहे. इंग्लंडने आपले चारही सामने अनुक्रमे न्यूझीलंड, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघांविरुद्ध गमावले आहेत. अशात इंग्लंडला विश्वचषक 2023 स्पर्धेत आपला सहावा सामना भारताविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअम येथे पार पडणार आहे. भारतीय संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. जर इंग्लंड भारताकडून पराभूत झाला, तर त्यांचा विश्वचषकातील प्रवास संपुष्टात येईल. चला तर, इंग्लंडसाठी उपांत्य सामन्यात पोहोचण्याचे समीकरण काय आहे जाणून घेऊयात…
उपांत्य सामन्यात कसा पोहोचणार इंग्लंड संघ?
इंग्लंड संघाला उपांत्य सामन्यात पोहोचण्यासाठी आता प्रत्येक सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. संघाला उरलेल्या चारही सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. उपांत्य सामन्यात पोहोचण्यासाठी संघांना कमीत कमी 12 गुणांची गरज आहे. मात्र, चारही सामने जिंकूनही इंग्लंडचे फक्त 10 गुणच होतील. अशात इंग्लंडला उर्वरित 4 सामन्यात फक्त विजय मिळवायचा नाही, तर मोठ्या अंतराने सामने जिंकावे लागतील. तसेच, इंग्लंडला इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागेल.
भारत, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघांचे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पोहोणचणे जवळपास निश्चित मानले जात आहे. अशात ऑस्ट्रेलियाने उरलेल्या सामन्यांमध्ये खराब प्रदर्शन करावे, असे इंग्लंड संघाला वाटत असेल. तसेच, पाकिस्तान आणि श्रीलंकेनेही पराभवाचा सामना करावा, असेही इंग्लंडला वाटत असेल.
भारताकडून पराभूत झाल्यानंतर काय?
इंग्लंड संघाला भारताविरुद्ध 29 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्यात पराभवाचा धक्का बसला, तर विश्वचषक 2023 स्पर्धेतील त्यांचा प्रवास इथेच संपेल. मात्र, भारतीय संघाविरुद्ध विजय मिळूनही इंग्लंडला इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल. भारतानंतर इंग्लंडला ऑस्ट्रेलिया संघाचा सामना करायचा आहे. तिथेही इंग्लंड पराभूत झाला, तर त्यांच्या गाडीला ब्रेक लागेल. म्हणजेच, गतविजेत्या इंग्लंडची अंतिम चार संघांमध्ये पोहोचण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे दिसते. (icc world cup 2023 england will be out from semifinal race if they face loss against team india see the all scenarios ind vs eng)
हेही वाचा-
‘दिल-दिल पाकिस्तान ऐकून…’, बाबरसेनेच्या पराभवानंतर माजी कर्णधाराचे लक्षवेधी विधान
मॅक्सवेलने मारला World Cup 2023चा सर्वात लांब षटकार, तुटला ‘या’ भारतीयाचा रेकॉर्ड, पाहा अफलातून व्हिडिओ