---Advertisement---

श्रीलंकेला हरवून इंग्लंडने WTC गुणतालिकेत घेतली झेप, भारताचा नुकसान झाला का?

---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात यजमान संघाने श्रीलंकेचा 5 विकेट्सने पराभव केला. या विजयासह इंग्लंडने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही मोठी झेप घेतली आहे. ही झेप घेऊन अंतिम फेरीत पोहोचण्याच्या इंग्लंडच्या आशा वाढल्या आहेत. आतापर्यंत इंग्लंडला एकदाही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठता आलेली नाही. पण गुणतालिकेत इंग्लंड अव्वल आल्याने टीम इंडियाचे नुकसान झाले का? चला तर मग जाणून घेऊयात.

श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी जिंकल्यानंतर इंग्लंडने गुणतालिकेत 2 स्थानांची प्रगती केली आहे. यापूर्वी इंग्लिश संघ सहाव्या स्थानावर होता पण आता तो चौथ्या स्थानावर आला आहे. इंग्लंड चौथ्या स्थानावर आल्याने भारतीय संघाला कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर कायम आहे

आता इंग्लंडची विजयाची टक्केवारी 41.07 झाली आहे. 2023-25 ​​च्या सायकलमध्ये इंग्लंडने आतापर्यंत एकूण 14 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी 7 जिंकले, 6 गमावले आणि 1 अनिर्णित राहिल आहे. सामना गमावल्यानंतर श्रीलंका पाचव्या स्थानावर आहे. श्रीलंकेने आतापर्यंत 5 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात 2 सामने जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत. आता श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात आणखी 2 कसोटी खेळल्या जाणार आहेत. ज्यामध्ये विजय मिळवून दोन्ही संघ आपापल्या स्थितीत आणखी सुधारणा करू शकतात.

सध्या टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ​​सायकलच्या पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. भारताची विजयाची टक्केवारी 68.52 आहे. टीम इंडियाने 9 सामने खेळले आहेत, ज्यात 6 जिंकले, 2 हरले आणि 1 अनिर्णित राहिले आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया 62.50 च्या विजयी टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर न्यूझीलंड 50.00 टक्के विजयासह तिसऱ्या स्थानावर, इंग्लंड 41.07 टक्के विजयासह चौथ्या स्थानावर आणि श्रीलंका 40.00 टक्के विजयासह पाचव्या स्थानावर आहे.

हेही वाचा-

9 षटकारांसह 27 चेंडूत 70 धावा, गुजरातच्या स्टार खेळाडूचा सामन्यात कहर
सुट्टी संपली! बांग्लादेश मालिकेपूर्वी कर्णधाराने कंबर कसली; अभिषेक नायरसोबत…
भारतीय कर्णधार रोहित शर्माबद्दल स्टार खेळाडूनं केलं खळबळजनक वक्तव्य! म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---