---Advertisement---

‘असे’ ठरणार कसोटी चॅम्पियनशीपमधील अव्वल दोन संघ; भारतासाठी वाट कठीण

---Advertisement---

पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेली जागतिक कसोटी चॅम्पियनशीप कोविड-१९ महामारीमुळे काही काळ बंद होती. आता, या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणारे दोन संघ निवडण्यासाठी‌ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने नवीन नियमांवर विचार करण्यास सुरुवात केली आहे. अंतिम फेरीत स्थान मिळण्यासाठी संघ सहभागी झालेल्या सामन्यांची व‌ त्यात मिळवलेल्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल.

गुणांची टक्केवारी घेतली जाईल विचारात
ईसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्ट नुसार, “आयसीसी संघांची अंकांची टक्केवारी विचारात घेऊन अंतिम दोन संघ निवडण्याच्या पर्यायावर विचार करत आहे. मात्र, याचा अंतिम निर्णय पुढील आठवड्यात होणाऱ्या आयसीसी कार्यकारिणीच्या बैठकीत होईल. चॅम्पियनशीपमध्ये सहभागी असलेल्या नऊ संघानी खेळलेल्या आणि त्यात मिळवलेल्या गुणांच्या टक्केवारीचा सारासार विचार करून अंतिम दोन संघ निवडले जातील.”

गुण वाटून घेण्याच्या निर्णयावर झाली होती असहमती
आयसीसीची यावर्षीची अखेरची तिमाही बैठक सोमवारपासून (१६ नोव्हेंबर) सुरू होणार आहे. रिपोर्टमधील माहितीनुसार, कोविड-१९ महामारीमुळे खेळल्या न गेलेल्या सामन्यांना ड्रॉ मानून त्यातील अंक वाटून देण्याचा पर्याय सुचवला गेला. मात्र, अनेक सदस्यांनी त्याला नकार दिल्याने हा पर्याय मागे पडला.

९ संघांमध्ये खेळवली जात आहे चॅम्पियनशीप
जागतिक क्रिकेट चॅम्पियनशीपमध्ये, कसोटी क्रमवारीतील पहिले नऊ संघ दोन वर्षात सहा मालिका खेळतात. प्रत्येक मालिकेत जास्तीत जास्त १२० गुण मिळवता येतात. चॅम्पियनशीपमध्ये अव्वल राहणारे दोन संघ जून २०२१ मध्ये क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर अंतिम सामना खेळतील.

पुढील दोन मालिका ठरवणार चॅम्पियनशीपची दिशा
नव्या गुणपद्धतीनुसार, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वच्यासर्व चार सामने गमावला आणि इंग्लंड विरुद्धचे सर्व पाच सामने जिंकला, तर भारतीय संघाचे ४८० गुण म्हणजेच ६६.६७ टक्के होतील. भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३-१ ने पराभूत आणि इंग्लंड विरुद्ध ५-० ने विजयी झाला, तर ७०.८३ टक्के गुण कमावेल. भारत ऑस्ट्रेलिया विरूद्ध २-० ने पराभूत झाला आणि इंग्लंड विरुद्ध ५-० अशा फरकाने जिंकला, तर ५०० म्हणजे ६९.४४ टक्के गुण मिळवेल.

न्यूझीलंडला आहे अंतिम फेरी गाठण्याची संधी
इतर संघांमध्ये न्यूझीलंड सर्वात सुस्थितीत आहे. वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत क्लीन स्वीप मिळवला, तर न्यूझीलंडचे ४२० गुण होतील. या ४२० गुणांसह न्यूझीलंडची टक्केवारी ७० इतकी होईल आणि न्यूझीलंड चॅम्पियनशीपमध्ये अव्वल दोनमध्ये राहून अंतिम सामना खेळेल.

भारत १७ डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियात ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळल. त्यानंतर, इंग्लंडचा संघ पाच कसोटी खेळण्यासाठी भारतात येणार आहे. या दोन मालिकांतून जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचे संघ निश्चित होऊ शकतात. सध्या भारतीय संघ ३६० गुणांसह चॅम्पियनशीपमध्ये अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड अनुक्रमे २९६ व २९२ गुणांसह दुसर्‍या व तिसर्‍या स्थानी आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“विराट जागतिक क्रिकेटमधील सामर्थ्यवान खेळाडू”, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाचे वक्तव्य

“वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिर्ची…”, युवराज सिंगकडून सानिया मिर्झाला अनोखी उपाधी

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ‘तो’ भारताचा महान गोलंदाज बनेल, ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भविष्यवाणी

ट्रेंडिंग लेख-

‘जिनीयस’ हेमांग बदानीची पुण्यातील ‘ती’ अद्वितीय खेळी

सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही

भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---