---Advertisement---

सीएसकेविरुद्ध धवनची बॅट आग ओकणार! ‘रनमशीन’ला मागे टाकत ‘बड्या’ विक्रमात सर्वांवर सरस ठरणार

On: रविवार, एप्रिल 3, 2022 4:52 PM
Shikhar-Dhawan-In-Nets
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा ११ वा सामना रविवारी (३ एप्रिल) पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघाचा हंगामातील तिसरा सामना असणार आहे. सीएसके संघ पहिल्या दोन्ही सामन्यात पराभूत झाला आहे, तर पंजाबने एक सामना जिंकला तर एका सामन्यात संघ अपयशी ठरला आहे. दरम्यान हा सामना शिखर धवनसाठी खास असणार आहे. तो या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा खास विक्रम तोडू शकतो, ज्यासाठी त्याला केवळ ४१ धावांची गरज आहे. 

विराट कोहलीने (Virat Kohli) सीएकेविरुद्ध सर्वाधिक ९४८ धावा केल्या आहेत, तर शिखर धवनने (Shikhar Dhawan) सीएसकेविरुद्ध ९०८ धावा केल्या आहेत. त्याने रविवारच्या सामन्यात ४१ धावा पुर्ण केल्या, तर तो विराट कोहलीचा विक्रम मोडू शकतो. सीएसकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा तो पहिला फलंदाज बनेल, तर विराट कोहली दूसरा फलंदाज ठरेल. पंजाबने आयपीएलच्या १५ व्या हंगामाची जोरदार सुरुवात करत पहिल्या सामन्यात आरसीबीला ५ विकेट्सने पराभूत केले होते. तर दूसऱ्या सामन्यात केकेआरविरुद्ध संघाला ६ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला आहे.

पंजाबचा सलामी फलंदाज मयंक अग्रवाल आणि शिखर धवन या हंगामात काही खास खेळी करताना दिसले नाहीत. आयपीएलमध्ये या जोडीला खतरनाक मानले जाते. शिखर धवन हा अनुभवी खेळाडू आहे. आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करणार दूसरा खेळाडू आहे.

शिखर धवनला अजून एक विक्रम करण्याची संधी
शिखर धवनला टी२० क्रिकेटमध्ये १ हजार चौकार पूर्ण करण्यासाठी ७ चौकारांची गरज आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात त्याने ७ चौकार पूर्ण केले तर तो टी२० मध्ये १००० चौकार लगावणारा पहिला भारतीय बनू शकतो. त्याने आत्तापर्यंत ९९३ चौकार लगावले आहेत. क्रिस गेलने सर्वाधिक ११३२ चौकार लगावले आहेत तर ऍलेक्स हेल्सने १०५४ चौकार लगावले आहेत. तसेच डेविड वाॅर्नरने १००५ चौकार ठोकले आहेत. आता लवकरच शिखर धवन यांच्या विशेष यादीत समाविष्ट होऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

Video: लाईव्ह शोमध्ये प्रीती झिंटाचे नाव घेताच भडकला इरफान पठाण अन् रैना झाला एप्रिल फूल प्रँकचा शिकार

ऑस्ट्रेलियाच्या महिला विश्वविजेत्या तर बनल्याच, पण रचेल हेन्सने २४ वर्षांच्या विक्रम मोडत नावावर केला विश्वविक्रम

सीएसकेची डगमगती गाडी रूळावर येणार? हुकुमी गोलंदाज दीपक चाहरबाबत मोठी अपडेट पुढे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---