कोलकाता। कालपासून (22 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात इडन गार्डन्स स्टेडियमवर दिवस-रात्र कसोटी सामन्याला(Day-Night Test) सुरुवात झाली आहे. या सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव 106 धावांत संपूष्टात आला आहे.
भारताकडून या डावात वेगवान गोलंदाज इशांत शर्माने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या आहेत. भारतात कसोटी क्रिकेट खेळताना एका डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची इशांतची ही केवळ दुसरीच वेळ आहे. त्याने भारतात पहिल्यांदा डिसेंबर 2007 मध्ये कारकिर्दीतील दुसराच कसोटी सामना खेळताना पाकिस्तान विरुद्ध बंगळूरु येथे 5 विकेट्स घेतल्या होत्या.
त्याच्या या कामगिरीनंतर पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इशांत म्हणाला, ‘मला वाटते की जर मी परदेशात विकेट घेऊ शकतो तर भारतात का नाही? आम्ही गेल्या दोन वर्षांत भारतात दुसरी कसोटी मालिका खेळत आहोत. आम्ही मागील 2 वर्षात परदेशात मालिका खेळल्या. त्यामुळे परदेशात ज्याप्रकारे मी कामगिरी करतो आणि परदेशात विकेट घेतो तीच लय आणि मानसिकता मला भारतात खेळतानाही कायम ठेवायची होती.’
तसेच गुलाबी चेंडूने खेळण्याबाबात इशांत म्हणाला, ‘लाल चेंडूपेक्षा गुलाबी चेंडू खूप वेगळा आहे. सुरुवातीला आम्ही सामान्य लेन्थवर गोलंदाजी करायला सुरुवात केली. तेव्हा चेंडू जास्त स्विंग करीत नव्हता.’
‘त्यानंतर आम्हाला कोणत्या लेन्थवर गोलंदाजी करावी हे समजले. आम्ही तीन वेगवान गोलंदाजांनी आपापसात चर्चा केली. त्यानंतर आम्ही योग्य लेन्थवर गोलंदाजी करण्यास सुरुवात केली.’
पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात 2 आणि दुसऱ्या सत्रात 3 विकेट्स घेतलेला इशांत म्हणाला, ‘डावकरी फलंदाजांना आउटस्विंगर गोलंदाजी करायचो. अधिक प्रभावी होण्यासाठी मला गोलंदाजीत विविधता आणण्याची आवश्यकता होती.’
तसेच इशांत पुढे म्हणाला, ‘मी आत्ता माझ्या क्रिकेटचा आनंद घेत आहे. मी आधी जास्त दबाव घ्यायचो. पण आता मी फक्त विकेट घेण्याचा विचार करतो.’
रिषभ पंतला टीम इंडियातून केले रिलिज, आता खेळणार या संघाकडून
वाचा????https://t.co/ZocjBxRtcZ????#म #मराठी #INDvsBAN #cricket @Mazi_Marathi @MarathiRT #TeamIndia #DayNightTest #PinkBall #PinkBallTest— Maha Sports (@Maha_Sports) November 23, 2019
३२वी धाव घेताच कर्णधार कोहली ठरला असा विक्रम करणारा पहिलाच भारतीय!
वाचा????https://t.co/jVZT0spUQg????#म #मराठी #INDvsBAN #cricket @Mazi_Marathi @MarathiRT #TeamIndia #DayNightTest #PinkBall #PinkBallTest #ViratKohli— Maha Sports (@Maha_Sports) November 22, 2019






