प्रो कबड्डी लीगच्या तिसऱ्या पर्वात पदार्पणानंतर रोहित कुमारने अगदी काही सामन्यातच रेडर म्हणून स्वत: ला सिद्ध केले. त्याच्या पहिल्याच मोसमात रोहितने पटना पायरेट्सकडून खेळताना विजेतेपद पटकावले आणि सर्वाधिक मूल्यवान खेळाडू (एमव्हीपी) पुरस्कार देखील खिशात घातला.
पायरेट्समधून निवड झाल्यानंतर बेंगळुरू बुल्सबरोबरचा त्याचा प्रवास २०१७ मध्ये सुरू झाला. त्याने तेथेही त्वरित प्रभाव पाडला आणि सहाव्या मोसमात कर्णधार म्हणून संघाला प्रथमच विजेतेपद मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. रोहित २०१६ मधल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या भारतीय कबड्डी संघाचा देखील भाग होता.
आपल्या ‘फ्रॉग जंप’ साठी प्रसिद्ध असलेल्या रोहितने कबड्डी व्यतिरिक्त अजून एका क्षेत्रात काम करायचा पर्याय देखील समोर ठेवला होता. प्रो कबड्डीच्या इन्स्टाग्राम लाइव्ह चॅट शो मध्ये बोलताना रोहित कुमार म्हणाला, “कबड्डीपटू नसतो तर मी अभिनेता होण्याचा प्रयत्न केला नक्की असता.”
रोहित व्यावसायिकरित्या कबड्डी खेळण्याविषयीच्या प्रवासाबद्दल बोलताना म्हणाला, “लहानपणी मला कोणत्याच खेळामध्ये रस नव्हता. माझ्या गावातील लोक कबड्डी खेळायचे. मी राकेश कुमार यांच्यासह काही इतरांना खेळताना पाहिले आणि यामुळे मला कबड्डी खेळायला प्रेरणा मिळाली. माझे वडील काही काळ कबड्डीपटू होते, परंतु ते दिल्ली पोलिसात दाखल झाले.
माझ्या वडिलांना मी कबड्डी खेळावे असे वाटत होते, म्हणून ते मला आमच्या गावात राकेश आणि मनजीत यांच्याबरोबर सामने बघायला घेऊन जायचे. मला वाटलं की जर मी राकेश कुमारसारखा कबड्डीपटू झालो तर चांगलं होईल. अशाप्रकारे मी सुरुवात केली, परंतु त्यात सातत्य नव्हतं, मी वेगवेगळे खेळ खेळायचो. मी अॅथलेटिक्स खेळलो आणि नंतर सांघिक खेळाऐवजी वैयक्तिक खेळात भाग घेण्याचा विचार केला. मी १०० मीटर, २०० मीटर, लांब उडी आणि उंच उडी या क्रीडाप्रकारात चांगला होते.
परंतु नंतर मी कबड्डी हाच खेळ निवडला कारण मला त्या खेळाची समाज चांगली होती. माझ्या वडिलांनी मला कबड्डीमध्ये अधिक प्रयत्न करण्यासाठी आणि यामध्ये करियर बनवण्यास सांगितले. हळूहळू, मी राज्य राष्ट्रीय संघात खेळायला लागलो आणि त्याचा आनंद घेऊ लागलो. मला किट बॅग मिळाली तेव्हा मी खूप खुश झालो. जेव्हा मी दिल्ली संघाची जर्सी परिधान केली तेव्हा भारताची जर्सी घालण्याचा विचारही माझ्या मनात डोकावून गेला आणि त्या दृष्टीने मी कठोर परिश्रम केले. ”
महत्त्वाच्या बातम्या-
–तब्बल ५ देशांविरुद्ध अँडरसनने केलाय अजब कारनामा, काल तर…
–१४० किलो वजनाच्या वेस्टइंडीजच्या खेळाडूने पकडला अप्रतिम झेल, कॅप्टनही झाला अवाक्
–चीयरलीडर्स ते स्ट्रॅटेजिक टाईम आऊट, पहा काय काय होणार आयपीएल २०२०मध्ये बदल
–निराशाजनक! पदार्पणाच्या वनडे सामन्यातच नर्वस नाइंटिजचे शिकार झालेले ५ क्रिकेटपटू
–टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ३- गब्बरची कसोटी क्रिकेटमध्ये जबर एन्ट्री
–अगदी सौरव तिवारीपासून या ६ कर्णधारांच्या अंडर खेळलाय धोनी