---Advertisement---

२०१९ विश्वचषकासाठी संधी मिळालेल्या ‘त्या’ खेळाडूचे शार्दुल ठाकुरने वाचवले होते करियर

On: सोमवार, मे 27, 2019 2:02 PM
---Advertisement---

30 मेपासून 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. या विश्वचषकासाठी तमिळनाडूचा अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकरने भारताच्या 15 जणांच्या संघात स्थान मिळवले आहे. त्यामुळे तो भारताकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.

पण जर मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने एक चूक केली नसती तर शंकरचे विश्वचषकात खेळण्याचे हे स्वप्न पूर्ण झाले नसते. याबाबद खूद्द शंकरनेच खूलासा केला आहे. युट्यूबवर गौरव कपुर होस्ट करत असलेल्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन या शोमध्ये शंकरने त्याच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट विषयी बोलताना हा खूलासा केला आहे.

शंकर म्हणाला, ‘पहिल्यांदा रणजी ट्रॉफीमध्ये सर्वात आधी ही गोष्ट घडली. ही तेव्हाची घटना आहे जेव्हा मी आणि माझा कर्णधार फलंदाजी करत होतो. आम्ही चांगली भागीदारी केली होती. पण आमची भागीदारी तो धावबाद झाल्याने तुटली आणि नंतर आम्ही सामना हरलो.’

‘त्यानंतर मी पूर्णपणे बाजूला ढकललो गेलो. माझ्याबद्दल कर्णधाराला आणि प्रशिक्षकांना कोणतीही समस्या नव्हती. पण बाहेरील लोक बोलायला लागले की हा याचा तमिळनाडूसाठी शेवटचा सामना होता आणि तो आता तमिळनाडूकडून परत कधी खेळणार नाही. त्यानंतर मला तमिळानाडू संघामध्ये येण्यासाठी संघर्ष करावा लागला.’

यानंतर शार्दुल ठाकूरबद्दल सांगताना शंकर म्हणाला, ‘मला अजून आठवतं सीएसकेच्या सामन्यानंतर शार्दुलने मला सांगितले होते की ‘मी तूला जीवदान दिले आहे.’ आम्ही चेन्नईमध्ये मुंबई विरुद्ध खेळत होतो.’

‘त्यावेळी शार्दुलने चांगला चेंडू टाकत मला त्रिफळाचीत केले. पण तो मोठा नो बॉल होता. त्यावेळी मी 5 धावांवर खेळत होतो. त्यानंतर मी 95 धावा केल्या. त्यामुळे तो माझा तमिळनाडूसाठी शेवटचा सामना ठरला असता. पण त्या नो-बॉलमुळे असे झाले नाही. त्या 95 धावांनी माझी मदत केली. पुढे माझा रणजी मोसम चांगला गेला. त्यानंतर मला भारत अ संघातही संधी मिळाली. तसेच पुढे सर्व बदलत गेले.’

शंकरने यावर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न येथे वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आत्तापर्यंत 9 वनडे खेळले असून 165 धावा आणि 2 विकेट्स घेतल्या आहेत. सध्या तो विश्वचषकासाठी भारतीय संघाबरोबर इंग्लंडमध्ये आहे.

पण त्याला सरावादरम्यान हाताची छोटी दुखापत झाल्याने तो न्यूझीलंड विरुद्ध भारताच्या पहिल्या सराव सामन्यात खेळला नव्हता. त्याची ही दुखापत गंभीर नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

हिटमॅन रोहित शर्माकडून पंड्या, धवन क्लिन बोल्ड, पहा व्हीडिओ

विश्वचषकात हा संघ ठरू शकतो ‘सरप्राईज पॅकेज’, सचिन तेंडुलकरने व्यक्त केले मत

पृथ्वी शॉची दमदार कॅप्टन्सी; जिंकले टी२० मुंबई लीगचे विजेतेपद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment