इंडियन प्रीमियर लीग 2023मध्ये अंबाती रायुडू चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग होता. सीएसकेसाठी त्याने आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात अंतिम सामन्यात महत्वाच्या धावाही केल्या होत्या. रायुडूने खेळलेला हा शेवटचा आयपीएल हंगाम असून भारतीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून त्याने निवृत्ती घोषित केली. असे असले तरी, रायुडू भविष्यात देखील सुपर किंग्ज फ्रँचायझीसाठी खेळताना दिसणार आहे.
आयपीएल 2023 संपताच रायुडू भारतीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्त झाल्याच्या बातमी समोर आल्या. रायुडूने जरी ही निवृत्ती घेतली असली, तरी तो भविष्यात सुपर किंग्जसाठी पुन्हा खेळताना दिसणार आहे. रायुडूने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून सुपर किंग्जच्या जर्सीतील फोटो देखील शेअर केला आहे. होय यावर्षी सुरू होत असलेल्या मेजर लीग क्रिकेटमध्ये टेक्सस सुपर किंंग्जसाठी रायुडू खेळणार आहे. या संघाची मालकी सुपर किंग्ज फ्रँचायझीकडे असून रायुडूला त्यांनी संघात कामय ठेवले आहे.
रायुडूने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर टेक्सर सुपर किंग्ज संघाच्या जर्सीतील फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “होच पिवळा रंग… पण खंड वेगळा… उत्सुक आहे…”
Same yellove…. Different continent… Texcited… pic.twitter.com/23chhztHkK
— ATR (@RayuduAmbati) June 15, 2023
दरम्यान टेक्सस पुर किंग्जसाठी मेजर लीगच्या पहिल्या हंगामात ड्वेन ब्रावो, डोवॉन कॉन्वे, मिचेल सँटनर आणि अंबाती रायुडू पुन्हा एकदा सोबत खेळणार आहेत. ड्वेन ब्रावो सीएसकेचा माजी अष्टपैलू असून सध्या तो संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहे. पण आगामी मेजल लीगमध्ये ब्रावोला पुन्हा एकदा गोलंदाजी करताना चाहते पाहू शकतात. डेवॉन कॉनवे आणि मिचेल सँटनर यांनी गुजरात जायंट्सकडून यावर्षी सीएसकेला विजेतेपद मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडू शकत होते. एमएस धोनी याच्या नेतृत्वात या खेळाडूंनी आयपीएल 2023ची ट्रॉफी उंचावली.
मेजर लीगमध्ये टेक्सर सुपर किंग्ज संघातील बहुतांश खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सीएसकेचा आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्टीफन फ्लेंमिंग यांच्याकडेच असणार आहे. गुजरात टायटन्सचा फिनिशर डेविड मिलर देखील टेक्सस संघासाठी खेळताना दिसणार आहे. येत्या 13 ते 30 जुलैदरम्यान अमेरिकेत आयोजित मेजर लीग पार पडेल. यात एकूण सहा संघ भाग घेणार आहेत.
टेक्सस सुपर किंग्जचा संपूर्ण संघ – रस्टी थेरॉन, लाहिरू मिलंताहा, सामी असलम, कोडी चेट्टी, सैतेजा मुकामल्ला, केल्विन सैवेज, मिलिंद कुमार, कैमरून स्टीवेन्सन, जिया शहजाद, डेवोन कॉनवे, अंबाती रायुडू, डेविड मिलर, गेराल्ड कोएत्जी, ड्वेन ब्रावो, डैनियल सैम्स, मिचेल सेंटनर. (In Major League Cricket, Ambati Rayudu will be seen playing for the Texas team of the Super Kings franchise)
महत्वाच्या बातम्या –
बांगलादेशने उद्ध्वस्त केले कसोटी क्रिकेटचे रेकॉर्ड, अफगाणिस्तावर मिळवला 500हून अधिक धावांनी दणदणीत विजय
शतक एक, विक्रम अनेक! रूटने सेंच्युरी ठोकताच मोडला डॉन ब्रॅडमन यांचा मोठा Record, एकदा वाचाच