भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी (7 डिसेंबर) खेळला गेला. मिरपूरच्या शेर ए बांगला स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. उभय संघांतील पहिला एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने भारताला कडवे आव्हान देत विजय मिळवला होता. मालिकेतीत दुसऱ्या सामन्यात देखील त्यांच्याकडून चाहत्यांना अशाच प्रदर्शनाच्या अपेक्षा होता. भारतीय गोलंदाज बुधवारी कसलेली गोलंदाजी केली, मात्र मेहदी हसन आणि महमुदुल्लाह यांच्या महत्वपूर्ण योगदानामुळे बांगलादेश संघाने 271 धावांपर्यंत मजल मारली.
मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यातप्रमाणेच दुसऱ्या सामन्यात देखील नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने लागला. भारतीय संघाला नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करावी लागली. प्रथम फलंदाजी कऱणाऱ्या बांगलादेशसाठी त्यांचे सलामीवीर फलंदाज काही खास कामगिरी करू शकले नाहीत. सलामीला आलेला अनामुल हक (Anamul Haque) आणि लिटन दार (Litton Das) यांनी अनुक्रमे 11 आणि 7 धावांची खेळी केली. महमदुल्लाह (Mahmudullah) याने 77 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तर मेहदी हसन मिराज (Mehidy Hasan Miraz) याने पुन्हा एकदा गुणवत्ता दाखवली. हसनने बांगलादेशसाठी सर्वाधिक …. धावा केल्या.
भारतीय गोलंदाजी विभागाचा विचार केला तर, वॉशिंगटन सुंदर (Washington Sundar) किफायतशीर ठरला. सुंदरने 10 षटकांमध्ये 37 धावा खर्च करून सर्वात जास्त तीन विकेट्स घेतल्या. भारताचा युवा वेगावन गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) याला या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली होती. मलिकने मिळालेल्या संधीचा फायदा उचलत महत्वाच्या दोन विकेट्स घेतल्या. यादरम्यान, त्याने 58 धावा खर्च केल्या. मोहम्मद सिराज मागच्या काही सामन्यांनंतर भारताचा एक चांगला वनडे गोलंदाज म्हणून समोर आला आहे. मात्र या सामन्यात तो संघाला चांगलाच महागात पडला. सिराजने दोन विकेट्स घेतल्या, पण यादरम्यान तब्बल 73 धावा खर्च केल्या. (In second ODI, Mehidy Hasan Miraz scored a century and took Bangladesh to 271 runs)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
उमरानचा बॉल गोळीसारखा आला अन् शाकिबचं हेल्मेट तोडून गेला, व्हिडिओ पाहून व्हाल हैराण
अर्रर्र! ऑस्ट्रेलियाचा कर्णधारच पडला दुसऱ्या कसोटीतून बाहेर, आता नेतृत्व कोण करणार?