पाकिस्तान संघासाठी न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात अपेक्षित पद्धतीने होऊ शकली नाही. उभय संघांतील पहिला टी-20 सामना ऑकलँडच्या ईडन पार्कवर खेळला गेला. यजमान न्यूझीलंड संघाने या सामन्यात 46 धावांनी विजय मिळवला. डॅरिल मिचेल आपल्या 61 धावांची वादळी खेळीमुळे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयानंतर पाच सामन्यांच्या या टी-20 मालिकेत न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली.
पाकिस्तानला या सामन्यात विजयासाठी 227 धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तारत 18 षटकांमध्ये 180 धावा करून संघ सर्वबाद झाला. माजी कर्णधार बाबर आझम () 35 चेंडूत 57 धावा करून बेन सीअर्स याच्या चेंडूवर केन विलियम्सन (Kane Williamson) याच्या हातात झेलबाद झाला. पाकिस्तानसाठी या सामन्यातील ही सर्वोत्तम खेळी ठरली. सलामीवीर सईम अयुब आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) यांनी अनुक्रमे 27 आणि 25 धावा करून विकेट्स गमावल्या. फकर झमान याने 15, इफ्तिखार अहमद 24, आझम खान 10 धावा करून बाद झाले. शाहीन आफ्रिदी एकही धाव करू शकला नाही. तळातील फलंदाजांमध्ये अमर जमाल 1* धाव करून शेवटपर्यंत टिकला. पण उसामा मीर आणि अब्बास अफ्रिदी यांनी प्रत्येकी एक-एक धाव करून विकेट्स गमावल्या. हॅरिस रौफ यानेही शुन्यावर विकेट गमावली.
टिम साऊदी याने या सामन्यात मोठा विक्रम नावावर केला. साऊदीने 4 षटकात 25 धावा खर्च करून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या आणि स्वतःच्या 150 टी-20 आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण केल्या. अडम मिल्ने आणि बेन सीअर्स यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. ईश सोढी यालाही एक विकेट मिळाली.
तत्पूर्वी नाणेफेक गमावल्यामुळे न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करावी लागली. 20 षटकांमध्ये न्यूझीलंडने 8 विकेट्सच्या नुकसानावर 226 धावा कुटल्या. यात डॅरिल मिचेल आणि केन विलियम्सन या दोघांचे योगदान सर्वात मोठे राहिले. मिचेलने 27 चेंडूत 61 धावा केल्या, तर विलियम्सनने 42 चेंडूत 57 धावांची खेळी केली. शाहीन शाह आप्रिदी आणि अब्बास अफ्रिदी यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. हॅरिस रौफ याने दोन विकेट्स नावावर केल्या. (In the first T20 match against New Zealand, Pakistan lost by 46 runs)
महत्वाच्या बातम्या –
कुलदीप-चहल नकोच; ‘या’ क्रिकेटरला विश्वचषकात द्या संधी, गावसकरांची बीसीसीआयकडे मागणी
Mitchell McClenaghan । IPL ट्रॉफी तिनदा जिंकणाऱ्या खेळाडू पुन्हा मुंबई इंडियन्ससोबत