भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ शनिवारी (14 ऑक्टोबर) विश्वचषक स्पर्धेत आमने सामने आले. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाकिस्तानला मात्र मोठी धावसंख्या करता आली नाही. अवघ्या 191 धावांवर पाकिस्तान संघ सर्वबाद झाला. भारताच्या पाच गोलंदाजांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल 10 विकेट्स वाटून घेतल्या.
वनडे विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये भारताने शनिवारी (14 ऑक्टोबर) आपला तिसरा सामना खेळला. प्रथम गोलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने पाकिस्तानला 200 धावांच्या आतमध्ये गुंडाळले. कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रविंद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. वनडे विश्वचषकाच्या इतिहासात ही केवळ तिसरी वेळ आहे, जेव्हा गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी पाच गोलंदाजांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या आहेत. विश्वचषकात अशी कामगिरी सर्वात पहिल्यांदा 2011 मध्ये भारतानेच केली होती. विशेष म्हणजे या सामन्यात भारताविरुद्ध पाकिस्तान संघ खेळत होता. त्यानंतर आठ वर्षांनी 2023 विश्वचषकात भारतीय संघाने पुन्हा एकदा असेच प्रदर्श करून दाखवले. दरम्यान, 2015 विश्वचषकात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनीही श्रीलंकेविरुद्ध अशी कामगिरी केली होती. (In this match against Pakistan, five Indian bowlers took two wickets each)
वनडे विश्वचषक सामन्यात संघासाठी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेणारे पाच गोलंदाज
– भारत विरुद्ध पाकिस्तान, 2011
(झहीर खान, आशीश नेहरा, मुनाफ पटेल, हरभजन सिंग, युवराज सिंग)
– न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, 2015
(टिम साउदी, ट्रेंट बोल्ट, ऍडम मिलने, ऍडियल व्हिटोरी, कोरी अँडरसन)
– भारत विरुद्ध पाकिस्तान, 2023
(जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान – अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ.
महत्वाच्या बातम्या –
“आम्ही आता अधिक धोकादायक बनू”, तिसऱ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा एल्गार
कुलदीपच्या एकाच ओव्हरमध्ये पाकिस्तानचा खेळ खल्लास! दोन धडाकेबाज फलंदाज तंबूत