मुंबईकर पृथ्वी शाॅने कसोटी पदार्पणातच शानदार शतक ठोकत सर्वांची वाहवा मिळवली होती. पृथ्वीची राजकोट येथील विंडिजविरूद्धच्या पहिल्या कसोटीतील खेळी स्विग्गी आणि फ्रिचार्ज या कंपन्यांना चांगलीच महगात पडली आहे.
स्विग्गी आणि फ्रिचार्ज यांनी सोशियल माध्यमांवर कंपनीच्या प्रसिद्धीसाठी पृथ्वी शाॅने केलेल्या शानदार कामगिरीचे क्रिएटीव प्रसिद्ध केले होते.
https://twitter.com/prvnkumar07/status/1049778179727024128
पृथ्वी शाॅचा व्यवसायिक कारभार पाहणाऱ्या बेसलाईन व्हेंचर्स या क्रिडा क्षेत्रातील मार्केटींग फर्मने स्विग्गी आणि फ्रिचार्ज कंपन्यांना पृथ्वीचे नाव त्याच्या परवानगी शिवाय ट्विटमध्ये वापरल्यामुळे कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
स्विग्गी आणि फ्रिचार्ज यांना प्रत्येकी एक कोटी रूपांयांची भरपाईची मागणी केली आहे. सामाजिक माध्यमांवरचा पृथ्वीच्या नावाचा वापर हा आमच्याकडे असलेल्या विशेष अधिकाराचा भंग आहे. त्याचबरोबर ट्रेडमार्क कायदा 1996 चे उल्लंघन आहे.
“याने फक्त खेळाडूच्या त्या कामगिरीवरच परिणाम होत नाही तर त्याचे सध्याचे आयोजक आणि भविष्यातील प्रायोजक यावर सुद्धा परिणाम होतो.” असे बेसलाईन व्हेंचर्सचे व्यवस्थापकीय संचालक तुहीन मिश्रा यांनी सांगितले.
स्विग्गीला नोटीस मिळाली असून त्यावर ते कायदेशीर उत्तर देणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- क्रिकेटप्रेमी मुंबईकरांना मोठा धक्का! वानखेडेवरील मॅच संदर्भात होऊ शकतो मोठा निर्णय
- धोनीच्या या निर्णयाने खलील अहमद झाला निशब्द
- भारताविरूद्धच्या वन-डे आणि टी-20 मालिकेतून विंडिजच्या २ मोठ्या खेळाडूंना डच्चू