शुक्रवारपासून (दि. 17 फेब्रुवारी) दिल्ली येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात भारतीय संघाचे अनेक खेळाडू चमकले. चेतेश्वर पुजारा याने सामन्यात पाऊल ठेवताच इतिहास रचला. तो 100वा कसोटी सामना खेळणारा भारताचा 13वा खेळाडू बनला. यानंतर आर अश्विन याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 कसोटी विकेट्स घेण्याचा कारनामा केला. या यादीत आता रवींद्र जडेजा याच्या नावाचाही समावेश झाला.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांच्या डावाची सुरुवात फार चांगली झाली नाही. त्यांचे 4 फलंदाज 108 धावांच्या आतच तंबूत परतले. यातील एक विकेट रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने चटकावली. त्याने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरत 125 चेंडूत 81 धावा करणाऱ्या उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याला केएल राहुल याच्या हातून झेलबाद केले.
रवींद्र जडेजाचा विक्रम
यासह जडेजाच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. तो कसोटी कारकीर्दीत 250 विकेट्सचा टप्पा पार करणारा खेळाडू बनला. विशेष म्हणजे, जडेजा याने ही कामगिरी 62 कसोटी सामन्यातील 117 डावात 2.44च्या इकॉनॉमी रेटने 250 विकेट्स चटकावल्या. तो कसोटीत भारताकडून 250 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा भारताचा 8वा गोलंदाज ठरला.
लान्स गिब्स, क्रेग मॅकडरमॉट आणि ब्रेट ली यांनीदेखील जडेजाइतक्याच 62 कसोटी सामन्यांमध्ये 250 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता.
पहिल्या कसोटीतही चमकला जडेजा
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील पहिल्या कसोटीत भारतीय संघाने एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यातील पहिल्या डावात रवींद्र जडेजा याने 51 विकेट्स आणि दुसऱ्या डावात 2 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. यावेळी त्याने दोन्ही डावात मिळून एकूण 34 षटके गोलंदाजी करताना फक्त 81 धावा खर्च केल्या होत्या. (RJadeja gets to 250 Test wickets in 62 Tests, the same as Lance Gibbs, Craig McDermott and Brett Lee)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाणेफेकीचा कौल जिंकत ऑस्ट्रेलिया करणार बॅटिंग, टीम इंडियात ‘या’ पठ्ठ्याचे पुनरागमन
रिटायर होऊन 5 वर्षे लोटली, पण डिविलियर्सचा ‘हा’ सर्वात खतरनाक विश्वविक्रम आजही अबाधित; जाणून घ्याच