चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने जिंकणारा भारतीय संघ तिसऱ्या कसोटीत संघर्ष करताना दिसला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बुधवारपासून (दि. 1 मार्च) इंदोर येथे खेळला जात आहे. पहिल्या डावात भारतीय संघ 109 धावांवर सर्वबाद झाला, तर दुसऱ्या डावात भारताने 163 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकीपटू नेथन लायन भलताच चमकला. त्याने यादरम्यान खास पराक्रमही केला. तेच आपण या लेखातून जाणून घेऊया…
नेथन लायनचा पराक्रम
नेथन लायन (Nathan Lyon) याने तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 8 अशाप्रकारे दोन्ही डावात मिळून 34.5 षटके गोलंदाजी करताना 99 धावा खर्च करत 11 विकेट्स घेतल्या. भारताच्या सध्याच्या प्लेइंग इलेव्हनमधील एका खेळाडूला वगळता नेथनने सर्व खेळाडूंना किमान एकदा तरी बाद केले आहे. विशेष म्हणजे, त्याने चेतेश्वर पुजारा याला सर्वाधिक वेळा, तर मोहम्मद सिराज याला सर्वात कमी वेळा बाद केले आहे.
Nathan Lyon took his second eight-wicket haul in India as the visitors edged close to a famous win in Indore 😯
Report 👇#INDvAUS | #WTC23https://t.co/l70F1lQDVv
— ICC (@ICC) March 2, 2023
भारताच्या सध्याच्या प्लेइंग इलेव्हनमधील चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) हा सर्वाधिक वेळा नेथनच्या गोलंदाजीचा शिकार झाला आहे. नेथनने त्याला सर्वाधिक 13 वेळा बाद केले आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी रोहित शर्मा (Rohit Sharma) असून त्याने नेथनच्या गोलंदाजीवर 8 वेळा विकेट गमावली आहे. याव्यतिरिक्त तिसऱ्या स्थानी विराट कोहली (Virat Kohli) याने 7 वेळा, आर अश्विन याने 6 वेळा, तर रवींद्र जडेजा आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी 5 वेळा नेथनविरुद्ध विकेट गमावली आहे.
याव्यतिरिक्त केएस भरत याने 3 वेळा, श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल यांनी प्रत्येकी 2 वेळा नेथन लायनविरुद्ध विकेट गमावली. तसेच, शेवटच्या स्थानी असलेल्या मोहम्मद सिराज याने फक्त 1 वेळा नेथनविरुद्ध विकेट गमावलीये. नेथन लायनला भारताच्या सध्याच्या प्लेइंग इलेव्हनपैकी फक्त अक्षर पटेल याची एकदाही विकेट घेता आली नाहीये. (ind vs aus 3rd test Nathan Lyon victims in current India playing XI see here)
नेथनने सर्वाधिक वेळा विकेट घेतलेले भारताच्या सध्याच्या प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडू
13 – चेतेश्वर पुजारा
8 – रोहित शर्मा
7 – विराट कोहली
6 – आर अश्विन
5 – रवींद्र जडेजा आणि उमेश यादव
3 – केएस भरत
2 – श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल
1 – मोहम्मद सिराज
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंदोर कसोटीवर ऑस्ट्रेलियाची घट्ट पकड! भारतीय फलंदाजी पुन्हा फेल, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 76 धावांचे लक्ष्य
ऑस्ट्रेलियाच्या ‘सिंहा’चा भारताविरुद्ध इतिहास! मुरलीधरनचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत बनला यशस्वी फिरकीपटू