अहमदाबाद येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 मधील या चौथ्या कसोटीत भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत याने शानदार कामगिरी केली. यावेळी काही भारतीय खेळाडू चौकारांवर काम चालवून घेत असतानाच भरतने असे काही गगनचुंबी षटकार मारले की, ऑस्ट्रेलियन गोलंदाजही पाहत राहिले. भरतने सर्वाधिक चोप ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमरून ग्रीन याला दिला. मात्र, शेवटी त्याला तंबूत जावे लागले. मात्र, आता त्याने केलेल्या फटकेबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कॅमरून ग्रीनविरुद्ध केली फटकेबाजी
भारतीय संघाकडून या मालिकेत पदार्पण करत असलेल्या केएस भरत याच्यासाठी सुरुवातीचे तीन सामने काही खास राहिले नाहीत. तो बॅटमधून खास कामिगरी करू शकला नाही. असे असूनही संघाने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि अहमदाबाद कसोटीत संधीही दिली. हाच विश्वास त्याने सार्थ ठरवला. त्याने डावाची सुरुवात धिम्या गतीने केली, परंतु त्यानंतर त्याने लय पकडत सलग दोन षटकार मारले.
खरं तर, सामन्याचे पहिले सत्र संपल्यानंतर भरतने मैदानावर पाऊल ठेवताच वेग घेतला. यावेळी कॅमरून ग्रीन (Cameron Green) याचा पहिलाच चेंडू डोक्यावरून जात होता, त्यावर भरतने जागेवरूनच शानदार षटकार मारला. भरत एवढ्यावरच थांबला नाही. त्याने यावेळी दुसऱ्या चेंडूवरही असाच एक शॉट खेळत सर्वांच्या भुवया उंचावल्या. मात्र, नंतर तो नेथन लायनच्या चेंडूवर 44च्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला. त्याच्या षटकारांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
ICYMI – @KonaBharat dispatched the short balls from Cameron Green into the stands.
Live – https://t.co/KjJudHvwii #INDvAUS @mastercardindia pic.twitter.com/FSAXCiCPNr
— BCCI (@BCCI) March 12, 2023
https://twitter.com/IncredibleSixes/status/1634813495056420869?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1634813495056420869%7Ctwgr%5Ed988fc2d132261058a197be968506f79c74bfccd%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.saamtv.com%2Fsports%2Fks-bharat-scored-21-runs-against-cameron-green-in-ind-vs-aus-4th-test-border-gavaskar-trophy-amd2000
भारतीय संघ 571वर सर्वबाद
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील अहमदाबाद कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रापर्यंत फलंदाजी केली. त्यांनी पहिल्या डावात 480 धावा कुटल्या. तसेच, दुसरीकडे, भारतीय संघानेही नांगर टाकून फलंदाजी केली. यावेळी भारताने पहिल्या डावात 571 धावा करत 91 धावांची आघाडी घेतली. भारताकडून शुबमन गिल (128) आणि विराट कोहली (186) यांनी शतकी खेळी रचली. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून नाईट वॉचमन म्हणून मॅथ्यू कुह्नेमन आणि ट्रेविस हेड फलंदाजीला उतरले. (ind vs aus 4th test live ks bharat hits 2 sixes on cameron green virat kohli shocked see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: शमीला पाहून चाहत्यांनी दिला ‘जय श्रीराम’चा नारा! पाहा पुढे काय घडले
पहिल्या 50 शतकांपेक्षा शेवटच्या 25 शतकांसाठी निघाला विराटचा घाम, आकडेवारीतून दिसतात परिश्रम