भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात क्रिकेटचे हे 75वे वर्ष आहे. उभय संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा निर्णयाक सामना अहमदाबाद येथे गुरुवारपासून (दि. 9 मार्च) खेळला जात आहे. या कसोटीला सुरुवात होण्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. या कसोटीत भारतीय संघात फक्त एक बदल झाला, तर ऑस्ट्रेलियाने इंदोर कसोटी जिंकणाऱ्या संघासोबतच मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात झालेला एक बदल म्हणजे मोहम्मद सिराज याचे महत्त्वाच्या कसोटीतून बाहेर पडणे.
काय म्हणाला रोहित?
कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेकीनंतर सांगितले की, मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याच्या जागी मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला संघात घेतले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर रोहित म्हणाला की, “आम्हीदेखील पहिल्यांदा फलंदाजीचाच निर्णय घेतला असता. आम्हाला माहिती आहे की, आम्हाला काय करण्याची गरज आहे. सिराजला आराम देण्यात आला आहे आणि शमीचे पुनरागमन झाले आहे. काही काळासाठी ब्रेक घेणे नेहमी चांगले असते. आम्हाला संघाच्या रूपात पुन्हा एक होऊन खेळण्याची गरज आहे.”
पुढे बोलताना रोहित म्हणाला की, “तुम्ही अनेक गोष्टींचा विचार करू शकता. पहिल्या तीन कसोटीत आम्ही जी खेळपट्टी पाहिली, ती चांगली नाहीये. मला आशा आहे की, इथे सर्व पाच दिवसांचा खेळ खेळला जाईल.”
सिराजची मालिकेतील कामगिरी
मोहम्मद सिराज याने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Austraila) संघातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील 3 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 24 षटके गोलंदाजी करताना 73 धावा खर्च करत फक्त 1 विकेट घेतली आहे. याव्यतिरिक्त मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा कारनामा रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने केला आहे. त्याने आतापर्यंत 4 सामन्यात 21 विकेट्स घेतल्या आहेत. (ind vs aus because of this mohammad siraj was ruled out of the fourth test rohit sharma given reason)
🚨 A look at #TeamIndia's Playing XI for the fourth Test 🔽#INDvAUS pic.twitter.com/M22giXR2vP
— BCCI (@BCCI) March 9, 2023
चौथ्या कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव
ऑस्ट्रेलिया-
ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरून ग्रीन, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, मॅथ्यू कुह्नेमन, नेथन लायन
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IND vs AUS 4th Test : नाणेफेकीचा निकाल कांगारूंच्या पारड्यात, भारतीय संघात महत्त्वाचा एक बदल
रोमांचक सामन्यात गुजरातचा पहिला विजय! आरसीबीच्या पदरी सलग तिसरी हार