भारतीय संघाला लाभलेल्या यशस्वी कर्णधारांमध्ये विराट कोहली याच्या नावाचाही समावेश होतो. विराटने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. विशेष म्हणजे, तो कर्णधार असताना त्याने अनेक खेळाडूंना पाठिंबा दिला आहे, त्यांना सांभाळूनही घेतले आहे. तसेच, त्याने खेळाडूंपुढे दमदार प्रदर्शन करत फिटनेसचे मानकही सादर केले आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली भारताकडून शुबमन गिल, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव यांसारख्या खेळाडूंनी पदार्पण केले. त्यातील सिराजचा प्रवास हा खूपच भावूक राहिला आहे. विराटने विश्वास दाखवत सिराजला 2017मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत पदार्पणाची संधी दिली होती. अशात दिनेश कार्तिक याने सिराजविषयी महत्त्वाचे विधान केले आहे.
काय म्हणाला कार्तिक?
दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्याविषयी विधान केले आहे. तो म्हणाला की, “तो आरसीबीसाठी कोरोना व्हायरसनंतर एक शानदार गोलंदाज म्हणून पुढे आला आहे. जेव्हा तो बाहेर पडणार होता, तेव्हा विराटने त्याला पाठिंबा दिला आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याची जागा निश्चित केली. मी कोलकातासोबत होतो आणि पाहिले की, सिराजने आमच्याविरुद्ध चांगली गोलंदाजी केली आहे. त्याने तीन विकेट्स घेतल्या आणि कोलाकाताला 100 हून कमी धावसंख्येवर बाद केले. तिथेच त्याच्या कारकीर्दीने झेप घेतली. त्याच्याकडे यशाची एक मोठी गोष्ट आहे, जी अनेकांना प्रेरित करू शकते.”
पुढे बोलताना कार्तिक म्हणाला की, “विराट सिराजसाठी एक मार्गदर्शक राहिला आहे. तो विराटला त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्यक्ती म्हणून महत्त्व देतो.” विराट आणि सिराज सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) कसोटीत एकत्र खेळत आहेत.
विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्याकडे भारतीय संघाची धुरा असताना भारताने ऑस्ट्रेलियात सातत्याने कसोटी मालिका जिंकल्या. तसेच, इंग्लंडविरुद्ध 2-2ने बरोबरी साधत परदेशात नवीन ताकद म्हणून उभारला. विराटने 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात, 2019 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते. (ind vs aus he was about to be out but virat kohli supported him dinesh karthiks big disclosure about mohammed siraj)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या माजी दिग्गजाची घसरली जीभ! बुमराहविषयी म्हणाला, ‘आयपीएल खेळला नाहीतर जग नष्ट होणार नाहीये’
ब्रेकिंग! भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, मॅक्सवेलसह स्टार खेळाडूंचे पुनरागमन