भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना शुक्रवारी (22 सप्टेंबर) मोहालीमध्ये खेळला जात आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्याच सामन्यात मोहम्मद शमी याने आपली गुणवत्ता दाखवून दिली. शमी भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेऊ शकला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघ 50 षटकात 276 धावा करू शकला.
ऑस्ट्रेलियासाठी या सामन्यात सलामीवीर डेविड वॉर्नर याने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. वॉर्नरव्यतिरिक्त स्टीव स्मिथ (41), मार्नस लॅबुशेन (39) आणि जोस इग्लिस (45) यांनी महत्वापूर्ण खेळी केली. पण संघातील दुसरा एकही फलंदाज अर्धशतक किंवा शतक करू शकला नाही. भारतासाठी मोहम्मद शमी याने 10 षटकांमध्ये 51 धावा खर्च करून सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह यालाही 10 षटकात 43 धावा खर्च केल्यानंतर एक विकेट मिळाली. फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. (IND vs AUS India needs 277 runs to become number 1 in all-formats)
पहिल्या वनडेसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्यूशेन, कॅमरून ग्रीन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ऍबॉट, ऍडम झम्पा.
महत्वाच्या बातम्या –
किस्से वर्ल्डकपचे: वर्ल्डकप म्हटलं की 2003 ची फायनल आणि पॉंटिंग डोक्यातून जात नाही
BREAKING! भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील रंगतदार सामन्यात पावसाची हजेरी, पाहुण्यांचे चार फलंदाज तंबूत