जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2021-23च्या अंतिम सामन्याच्या चौथ्या दिवशी शुबमन गिल लवकर बाद झाला. स्कॉट बोलँड याने गिलला कॅमरून ग्रीन याच्याकडून झेलबाद केले. यावेळी गिल 19 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. मात्र, ग्रीनच्या झेल पकडण्यावरून वाद झाला. यावर जगभरातील क्रिकेटप्रेमींसोबतच माजी दिग्गज क्रिकेटपटूंनीही प्रतिक्रिया दिल्या. यात भारतीय माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचाही समावेश आहे.
सोशल मीडियावरही युजर्सने तिसऱ्या पंचांवर राग व्यक्त केला. लोकांनी पंचांवर ऑस्ट्रेलियाच्या बाजूने निर्णय दिल्याचा आरोप लावला. तिसऱ्या पंचांनी सांगितले की, चेंडूच्या खाली बोट होते, पण समालोचकांसह इतर ज्यांनीही हा क्षण पाहिला, त्यांनी सांगितले की, बोटांमध्ये अंतर होते आणि चेंडू गवताला स्पर्श होत होता. त्यामुळे शुबमन गिल (Shubman Gill) याला नाबाद दिले गेले पाहिजे होते.
शास्त्रींची प्रतिक्रिया
शुबमन गिल याला अशाप्रकारे बाद दिले जाणे भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना पटले नाही. त्यांनी म्हटले की, “जर शुबमन गिल याच्या जागी स्टीव्ह स्मिथ असता, तर पंचांनी नाबाद दिले असते.” शास्त्रींनी हे भाष्य जरी हसत हसत केले अले, तरीही एकप्रकारे त्यांनी तिसऱ्या पंचांवर टीकास्त्र डागले होते.
कुमार संगकारालाही तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर संशय
एवढेच नाही, तर समालोचक आणि श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी दिग्गज कर्णधार कुमार संगकारा यानेही तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर संशय व्यक्त केला. तो म्हणाला की, “होय, तुम्ही याकडे कशाप्रकारे पाहता, हे महत्त्वाचे आहे. त्यांनी बोटाच्या खालून चेंडू पकडला, पण जर चेंडूचा कोणताही भाग जमिनीला शिवत असेल, तर याची व्याख्या चेंडू हातात राहण्यास मदत म्हणून केली जाऊ शकते. सामान्यत: पंच नेहमी नाबाद निर्णय घेतात.”
चौथ्या दिवसाखेर भारताचा डाव
भारतीय संघाने चौथ्या दिवसाखेर 3 बाद 164 धावा केल्या. भारताकडून विराट कोहली (नाबाद 44) आणि अजिंक्य रहाणे (नाबाद 20) टिकून खेळतायेत. अशाप्रकारे भारत विजयापासून अद्याप 280 धावा दूर आहे. (ind vs aus ravi shastri big statement on shubman gill third umpire out decision read here)
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या ‘सिंहा’पुढे रोहितची होते चिडीचूप, आतापर्यंत कसोटीत ‘इतक्यांदा’ दाखवला तंबूचा रस्ता
कसोटीत ऑस्ट्रेलियाला चोपणाऱ्या 5 भारतीयांच्या यादीत विराटचाही समावेश, पण ‘किंग’चा नंबर कितवा?