ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर टीम इंडियातडून तिसऱ्या वनडेमध्ये मोठ्या कामगिरीची आपेक्षा होती. मात्र तिसऱ्या वनडे सामन्यातही भारताचा वाईट रित्या पराभव झाला आहे. आशाप्रकारे यजमान ऑस्ट्रेलियाने भारताला 3-0 ने क्लीन स्वीप केला आहे. पर्थच्या (WACA) मैदानावर खेळल्या जात असलेल्या या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला 299 धावांचे मोठे लक्ष्य मिळाले. ज्याचा पाठलाग करताना सलामीवीर स्मृती मानधनाने मोठी कामगिरी केली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या प्रचंड धावसंख्येला प्रत्युत्तर देताना भारतीय सलामी जोडीची सुरुवात खूपच खराब झाली. रिचा घोष 16 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर हरलीन देओलने स्मृती मंधानाला साथ दिली आणि दुसऱ्या विकेटसाठी 100 हून अधिक धावांची भागीदारी केली. यादरम्यान स्मृती मानधना आपले अर्धशतक पूर्ण करण्यात यशस्वी ठरली. त्यानंतर भारताला दुसरा मोठा धक्का 134 धावांवर हरलीनच्या (39 धावा) रूपाने बसला. यानंतर मैदानात उतरलेली भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर काही विशेष करू शकली नाही. केवळ 12 धावा करून ती ॲनाबेल सदरलँडची शिकार झाली.
स्मृती मंधानाने 34 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर दुहेरी धाव घेत एकदिवसीय कारकिर्दीतील तिचे 9वे शतक झळकावले. तिने 103 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात दुसरे शतक झळकावले. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2 वनडे शतक झळकावणारी मानधना पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
याआधी कोणत्याही भारतीय महिला क्रिकेटपटूला ही मोठी कामगिरी करता आली नाही. ऑस्ट्रेलियन भूमीवर एकापेक्षा जास्त एकदिवसीय शतक झळकावणारी मानधना ही पहिली महिला खेळाडू ठरली आहे. इतकेच नाही तर मानधनाचे या वर्षातील हे चौथे एकदिवसीय शतक असून तिने एक मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. वनडे क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात 4 शतके झळकावणारी मानधना जगातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
एका कॅलेंडर वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारी महिला क्रिकेटपटू
4 – स्मृती मानधना (2024)
3 – बेलिंडा क्लार्क (1997)
3 – मेग लॅनिंग (2016)
3 – एमी सॅटरथवेट (2016)
3 – सोफी डिव्हाईन (2018)
3- सिद्रा अमीन (2022)
3 – लॉरा वोल्वार्ड (2024)
हेही वाचा-
SMAT: बंगाल, उत्तर प्रदेश आणि सौराष्ट्राचे स्वप्न भंगले, उपांत्य फेरीचे चारही संघ ठरले
VIDEO; मैदानातच दोन भारतीय खेळाडूंमध्ये झाली बाचाबाची! व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
या आशियाई देशात प्रथमच होणार फिफा विश्वचषकाचं आयोजन, भारताकडेही क्वालिफाय होण्याची संधी!