भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका मंगळवारी (20 सप्टेंबर) सुरू झाली. मालिकेतील हा पहिला सामना मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळला जात आहे. सामना रात्री सात वाजता सुरू होणार असून ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
🚨 Toss Update 🚨
Australia have elected to bowl against #TeamIndia in the first #INDvAUS T20I.
Follow the match 👉 https://t.co/ZYG17eC71l pic.twitter.com/jxRYDRl9Bk
— BCCI (@BCCI) September 20, 2022
भारताची प्लेइंग इलेव्हन पाहून अनेकांना धक्का बसला. संघ व्यवस्थापनाने रिषभ पंत (Rishabh Pant) प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले असून, दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसेल. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीतून सावरल्यानंतर मैदानात पुनरागमन करणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु बुमराहला देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली नाहीये. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेविड वॉर्नर या मालिकेत खेळत नाहीये. तसेच मिचेल स्टार्क, मिचेल मार्श आणि मार्कस स्टॉयनिस यांच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियन संघ ही मालिका खेळेल.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत (प्लेइंग इलेव्हन):
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, उमेश यादव, युझवेंद्र चहल.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन)-
ऍरॉन फिंच (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, नॅथन एलिस, ऍडम झम्पा, जोश हेझलवूड.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कार्तिकला घ्या ‘त्याला’ काढा! माजी दिग्गजाची टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर मोठी प्रतिक्रिया
पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीगमध्ये परमार ऑल स्टार्स, आरएस कॅनन्स, बॉल ब्रेकर्स, द व्हर्लविंड्स संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश