---Advertisement---

IND VS AUS; केएल राहुल-यशस्वी जयस्वालचा डंका! ऑस्ट्रेलियात भारताकडून सर्वोच्च सलामी भागिदारी

---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांचा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना पर्थमध्ये खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी 201 धावांची सलामीची भागीदारी करून भारताला मजबूत स्थितीत आणले. इतकेच नव्हे तर या भागीदारीच्या जोरावर या दोघांनीही विक्रमांची मालिका रचली. ऑस्ट्रेलियात भारताची ही आतापर्यंतची सर्वात मोठी सलामीची भागीदारी आहे. होय, राहुल-जयस्वाल यांनी मिळून गावस्कर-श्रीकांतचा 38 वर्ष जुना विक्रम मोडला आहे.

यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांच्या आधी, सुनील गावस्कर आणि कृष्णमाचारी श्रीकांत यांच्याकडे ऑस्ट्रेलियात भारताच्या सर्वोच्च सलामीच्या भागीदारीचा विक्रम होता. या दोन माजी खेळाडूंनी 1986 मध्ये सिडनीमध्ये 191 धावांची भागीदारी केली होती. आता यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलने 201 धावांची भागीदारी करून हा विक्रम मोडला आहे.

ऑस्ट्रेलियात भारतासाठी सर्वात मोठी सलामीची भागीदारी

201 – यशस्वी जयस्वाल- केएल राहुल पर्थमध्ये (2024)*

191 – सुनील गावस्कर- कृष्णमाचारी श्रीकांत सिडनीमध्ये (1986)

165 – चेतन चौहान- सुनील गावस्कर मेलबर्नमध्ये (1981)

जर आपण सेना देशांमधील भारताच्या सर्वात मोठ्या सलामीच्या भागीदारीबद्दल बोलयाचे तर राहुल आणि जयस्वाल या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. या यादीत ते अवघ्या 13 धावांनी नंबर-1 चे स्थान हुकले. .

सेना देशांमध्ये भारताकडून सर्वोच्च ओपनिंग भागिदारी 

213- सुनील गावस्कर, चेतन चौहान विरुद्ध इंग्लंड, ओव्हल, 1979

203 – विजय मर्चंट, मुश्ताक अली विरुद्ध इंग्लंड, मँचेस्टर, 1936

201 – यशस्वी जयस्वाल, केएल राहुल विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पर्थ, 2024

191 – सुनील गावस्कर,  श्रीकांत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिडनी, 1986

165 – सुनील गावस्कर, चेतन चौहान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मेलबर्न, 1981

यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल ही जोडी ऑस्ट्रेलियात पाहुण्या संघाची जोडी म्हणून 200 हून अधिक धावांची भागीदारी करणारी 6वी सलामी जोडी ठरली आहे.

ऑस्ट्रेलियात 200 हून अधिक धावांची भागीदारी असलेल्या पाहुण्या संघाची सलामी जोडी

323 – जॅक हॉब्स, विल्फ्रेड रोड्स (इंग्लंड), मेलबर्न, 1912

283 – जॅक हॉब्स, हर्बर्ट सटक्लिफ (इंग्लंड), मेलबर्न, 1925

234 – बॉब बार्बर, जेफ्री बॉयकॉट (इंग्लंड), सिडनी, 1966

223 – बिल अथे, ख्रिस ब्रॉड (इंग्लंड), पर्थ, 1986

203 – मायकेल आथर्टन, ग्रॅहम गूच (इंग्लंड), ॲडलेड, 1991

201 – यशस्वी जयस्वाल, केएल राहुल (भारत), पर्थ, 2024

हेही वाचा-

IND vs AUS: यशस्वी जयस्वालचे ऐतिहासिक शतक, 47 वर्षांनंतर भारतीयाद्वारे ऑस्ट्रेलियात अशी कामगिरी!
IPL 2025 Mega auction; सर्वात आधी या खेळाडूंवर लागणार बोली, या ठिकाणी पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग
रिषभ पंतने ‘अनोखे शतक’ झळकावून इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---