भारत-बांगलादेश यांच्यातल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईत खेळला जात आहे. टीम इंडियानं दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 308 धावांची आघाडी घेतली. भारतानं पहिल्या डावात 376 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 149 धावांवर ऑलआऊट झाला. भारताकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक 4 बळी घेतले. दुसऱ्या डावात टीम इंडियानं 3 गडी गमावून 81 धावा केल्या. शुभमन गिल (33) आणि रिषभ पंत (12) क्रिजवर आहेत.
पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही भारताची सुरुवात खराब झाली. टीम इंडियानं 67 धावांवर 3 विकेट गमावल्या. रोहित शर्मा अवघ्या 5 धावा करून बाद झाला. यशस्वी जयस्वाल 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर विराट कोहली 17 धावा करून बाद झाला. त्यानं 37 चेंडूंचा सामना करत 2 चौकार मारले. गिल 64 चेंडूत 33 धावा करून नाबाद आहे. तर दुसऱ्या टोकावर रिषभ पंत 13 चेंडूत 12 धावा करून त्याची साथ देत आहे.
भारतानं दुसऱ्या डावात 3 विकेट गमावल्या असल्या तरी टीम इंडियाकडे 308 धावांची आघाडी आहे. एवढं लक्ष्यही बांगलादेशसाठी जड जाऊ शकतं. संघ पहिल्या डावात 149 धावांवरच गडगडला होता. चेन्नईच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांचं वर्चस्व दिसून येत आहे. त्यामुळे बांगलादेशला दुसऱ्या डावातही फलंदाजी करणं सोपं जाणार नाही.
आज दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांच्या मिळूण एकूण 17 विकेट पडल्या. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमच्या इतिहासात पहिल्यांदाच एका दिवसात एवढ्या विकेट पडल्या आहेत.
हेही वाचा –
यशस्वी जयस्वालच्या नावावर विश्वविक्रम! दिग्गजांना टाकले मागे
आकाश दीपच्या वेगानं बांगलादेशी फलंदाज हादरले, प्रशिक्षक मोर्ने मॉर्केलची प्रतिक्रिया व्हायरल
भारतीय कर्णधाराने मागितली सिराजची माफी, कारण काय?