भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्मा आपल्या मजेशीर स्वभावासाठी ओळखला जातो. रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघ सध्या विशाखापट्टणममध्ये कसोटी सामना खेळत आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा दुसरा सामना आहे. पहिल्या डावात बारतीय संघाने 143 धावांची आघाडी घेतली असून दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंड संघ 171 धावांनी मागे आहे. कर्णधार रोहित शर्मा याचा स्टम्प माईकमध्ये कैद झालेला आवाज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उभय संघांतील या सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात 396 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाचा पहिला डाव 253 धावांवर गुंडाळला गेला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्याआधी भारतीय संघ दुसऱ्यांदा फलंदाजीला आला. भारताने दुसऱ्या दिवसाचा खेल संपेपर्यंत आपल्या दुसऱ्या डावात 5 षटके खेळून काठली आणि एकही विकेट न गमावता 28 धावा केल्या. यशस्वी जयस्वाल 15*, तर रोहित शर्मा 13* धावांसह खेळपट्टीवर कायम आहेत.
उभय संघांतील या सामन्याच्य दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी (3 फेब्रुवारी) रोहित शर्मा याने सहकारी खेळाडूंसाठी काही अपशब्द वापरल्याचे समोर येत आहे. सहकारी खेळाडूंना फटकारण्यासाठी रोहितने हे शब्द वापरल्याचे बोलले जात आहे. हा आवाज सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर याविषयी वेगवागळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
Rohit Sharma via Stump Mic. pic.twitter.com/jKFn7KPh4V
— CricketGully (@thecricketgully) February 3, 2024
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, कुलदीप यादव
इंग्लंड – झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रुट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.
महत्वाच्या बातम्या –
पाहुण्यांची अचानक मैदानात उपस्थिती, थांबवावा लागला लागला श्रीलंका-अफगाणिस्तानमधील एकमात्र कसोटी सामना
VIDEO । यशस्वी जयस्वालपुढे सगळे पाणी कम! इंग्लिश चाहत्यांनी उभं राहून वाजवल्या टाळ्या