IND vs ENG: राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी20 मध्ये इंग्लंडने टीम इंडियाचा 26 धावांनी पराभव केला. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा टी20 सामना शुक्रवार 31 जानेवारी रोजी खेळला जाईल. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका जिंकायची आहे. मात्र, जर टीम इंडियाला पुण्यात खेळला जाणारा चौथा टी2 जिंकायचा असेल, तर त्यांना या 5 प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील.
ध्रुव जुरेलवर विश्वास ठेवावा का?
रिंकू सिंग जखमी झाल्यानंतर, यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलला सातव्या क्रमांकावर संधी देण्यात आली. जुरेल दुसऱ्या आणि तिसऱ्या टी20 मध्ये टीम इंडियाचा भाग होता. पण दोन्ही वेळा तो अपयशी ठरला. अशा परिस्थितीत प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न आहे की ध्रुव जुरेलवर पुन्हा विश्वास ठेवायचा की नाही?
वेगवान गोलंदाजांसमोर संजू सॅमसनची कमजोरी
दक्षिण आफ्रिकेत तीन शतके झळकावणारा संजू सॅमसन इंग्लंडविरुद्धच्या तिन्ही सामन्यांमध्ये अपेक्षेनुसार कामगिरी करू शकलेला नाही. वेगवान गोलंदाजांसमोर संजू सॅमसनची कमकुवतपणा स्पष्टपणे दिसून येतो. चौथ्या टी20 सामन्यापूर्वी सॅमसनचा खराब फॉर्म भारतीय संघ व्यवस्थापनासाठी चिंतेचा विषय असेल. सध्याच्या मालिकेत त्याने अनुक्रमे 26, 05 आणि 06 धावा केल्या आहेत. जे चिंतेचा विषय आहे. तो 145 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने जाणाऱ्या चेंडूंचा सामना करू शकत नाही. इंग्लंडचे जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड 145 ते 155 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतात. जे सॅमसनसाठी अडचणीचे कारण बनले आहे.
रमणदीप सिंगला संधी द्यायला हवी का?
रिंकू सिंगच्या पाठीच्या दुखापतीमुळे ध्रुव जुरेलला सातव्या क्रमांकावर पाठवण्यात आले होते. परंतु तो या फॉरमॅटमध्ये बसू शकत नाही. अशा परिस्थितीत प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांना आता रमणदीप सिंगला संधी द्यावी का याचा विचार करावा लागेल. रमनदीप सिंग हा फिनिशर असण्यासोबतच एक चांगला वेगवान गोलंदाज आहे.
शिवम दुबेचा अंतिम अकरा जणांमध्ये समावेश करावा का?
राजकोटमध्ये भारताची मधळी फळी इंग्लंडच्या लेग स्पिनर आदिल रशीदला हाताळू शकली नाही. त्याच वेळी, नितीश रेड्डी जखमी झाल्यानंतर संघात स्थान मिळालेल्या शिवम दुबेला संधी मिळायला हवी. दुबे हा फिरकी गोलंदाजांविरुद्ध मोठे षटकार मारण्यात तज्ज्ञ आहे. अशा परिस्थितीत आता दुबेला संधी मिळते की नाही हे पाहणे रंजक ठरेल.
शमीच्या जागी अर्शदीप सिंग?
डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला तिसऱ्या टी20 मध्ये विश्रांती देण्यात आली. परिणामी, टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत, आता प्रश्न असा आहे की मोहम्मद शमीच्या जागी अर्शदीप सिंगला परत आणावे का? मोहम्मद शमी बऱ्याच काळानंतर संघात परतला आहे. अश्या स्थितीत त्याला लय मिळवण्यासाठी आणखी एका सामन्याची गरज आहे.
हेही वाचा-
उस्मान ख्वाजानं द्विशतक ठोकून रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिलाच ऑस्ट्रेलियन
आधी शतक आता हॅट्ट्रीक, मुंबईचा हा खेळाडू रणजी ट्राॅफीमध्ये घालतोय धुमाकूळ, टीम इंडियामध्ये परतणार?
किंग कोहलीसाठी स्टेडियमबाहेर तुफान गर्दी, विराटच्या नावानं मैदान दणाणलं..! पाहा VIDEO