भारत आणि इंग्लंडमध्ये १ जुलैपासून एकमात्र कसोटी सामना सुरू होणार आहे. मागच्या वर्षी कोरोनामुळे हा सामना रद्द केला गेला होता, जो यावर्षी पुन्हा आयोजित केला गेला आहे. इंग्लंडने नुकतीच न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका ३-० अशा मोठ्या अंतराने जिंकली आहे. भारताविरुद्धही त्यांचा संघ अशाच फॉर्ममध्ये असेल, यात शंका नाही. भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडच्या फलंदाजांना झटपट बाद करण्याचे मोठे आव्हान या सामन्यात आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुट, यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो आणि कर्धणार बेन स्टोक्स सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. या तिघांनी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अप्रतिम प्रदर्शन केले आणि विरोधी संघाला क्लीन स्वीप दिला. भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकमात्र कसोटी सामन्या या तीन खेळाडूंना लगाम घालणे सर्वात महत्वाचे आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या खांद्यावर ही जबाबादीर प्रमुख्याने असणार आहे.
मागच्या वर्षी भारतीने इंग्लंड दौऱ्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली, पण मालिकेतील शेवटचा सामना कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द केला गेला होता. पहिल्या चार सामन्यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सर्वाधिक १८ विकेट्स घेतल्या होत्या. अशात १ जुलैपासून सुरू होणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यातही बुमराहकडून खूप अपेक्षा आहेत.
बुमराह व्यतिरिक्त मोहम्मद सिराजने देखील मागच्या वर्षीचा इंग्लंड दौरा गाजवला होता. सिराजने मालिकेतील पहिल्या चार सामन्यांमध्ये ३०.७१ च्या सरासरीने १४ विकेट्स घेतल्या. अशात मालिकेतील या शेवटच्या सामन्यात सिराजकडून देखील चाहत्यांना अपेक्षा आहेत. काही दिवसांपूर्वी भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने याविषयी प्रतिक्रिया दिली होती. अजित आगरकर (Ajit Agarkar) म्हटला की, “सिराजने मागच्या वर्षी चांगले प्रदर्शन केले, जेव्हा भारताने इंग्लंडविरुद्ध चार कसोटी सामने खेळले होते. त्याच्या प्रदर्शनात खूप सुधारणा झाली आहे आणि त्याला बाहेर करण्याचे काहीच कारण नाहीये.”
अगरकरने असेही म्हटले की, त्याला भारतीय संघाता तिसऱ्या आणि चौथ्या वेगवान गोलंदाजाच्या रूपात मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुरला पाहायला आवडेल. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांचे संघातील स्थान पक्के आहे. वेगवान गोलंदाजांच्या इतर पर्यायांमध्ये सिराज, शार्दुल ठाकुर, प्रसिद्ध कृष्णा आणि उमेश यादव यांचा समावेश आहे. मागच्या वर्षी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध चार वेगवान गोलंदाजांसह उतरला होता. आता यावर्षी संघ व्यवस्थापन याविषयी काय निर्णय घेते, हे लवकरच समजेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
एवढं सगळ करूनही संजू सॅमसनवर भारतीय दिग्गज नाराजच! वाचा काय म्हणतोय
हार्दिक पंड्याने चालवला कॅप्टन कूलचा वारसा, मालिका विजयानंतर केलेल्या कृत्याचं होतय तोंडभरून कौतुक
दीपक हुड्डा आणि संजू सॅमसनच्या वादळाने उध्वस्त केले सारेच विक्रम, नावावर केला टी२०तील वर्ल्ड रेकॉर्ड