भारतीय महिला संघाने रविवारी (३१ जुलै) पाकिस्तान संघाचा सामना केला. सध्या इंग्लंडमध्ये कॉमनवेल्थ गेम्स खेळल्या जात आहेत. यावर्षी महिला क्रिकेटला पहिल्यांदाच या स्पर्धेत सामील केले गेले आहे. रविवारी भारतीय संघाने या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला मात दिली. यादरम्यान भारताची दिग्गज फलंदाज स्मृती मंधाना हिने एका खास विक्रमाची नोंद केली.
पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघाने फलंदाजी आणि त्याआधी गोलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये अप्रतिम प्रदर्शन केले. पाकिस्तानने हा सामना ८ विकेट्सच्या अंतराने गमावला. कॉमनवेल्थ गेम्समध्ये खेळले जाणारे क्रिकेट सामने हे टी-२० प्रकारातील आहेत. भारताविरुद्धच्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली आणि संघ १०० धावांचा टप्पा देखील पार करू शकला नाही. प्रत्युत्तरात भारताच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आलेली स्मृती मंधाना (Smriti Mandhana) शेवटपर्यंत नाबाद राहिली.
स्मृतीने या सामन्यात एकूण ४२ चेंडू खेळले आणि यामध्ये नाबाद ६३ धावा कुटल्या. या धावा तिने ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने केल्या. या प्रदर्शनाच्या जोरावर स्मृती टी-२० क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना १००० धावा करणारी तिसरी भारतीय क्रिकेटपटू बनली आहे. यापूर्वी विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी ही कामगिरी केली आहे. केवळ महिला क्रिकेटचा विचार केला, तर ती अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. मातिली राजने टी-२० प्रकारात लक्ष्याचा पाठलाग करताना ९७७ धावा केल्या आहेत. परंतु क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे आता मिताली हा विक्रम कधीच नावावर करू शकणार नाही.
लक्षाचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू (आंतरराष्ट्रीय टी-२०)
१७८९ – विराट कोहली
१३७५ – रोहित शर्मा
१०५९ – स्मृती मंधाना
https://twitter.com/BCCIWomen/status/1553727478224416768?s=20&t=UQt8jL7qGghhpqEYc1Ef4A
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजी आक्रमाणापुढे त्यांचा संघ अवघ्या ९९ धावा करून सर्वबाद झाला. भारताला मिळालेले १०० धावांचे लक्ष्य, संघाने २ विकेट्सच्या नुकसानावर आणि ११.४ षटकांमध्ये गाठले. भारताला आता लीग स्टेजमधील त्यांचा तिसरा आणि शेवटचा सामना बारबाडोस संघाविरुद्ध खेळायचा आहे, जो ३ ऑगस्ट रोजी नियोजित आहे. भारताने लीग स्टेजच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टीम इंडिया जिंकतेय तरी ‘या’ चार समस्या वाढवतायेत डोकेदुखी
भारताने पाकिस्तानविरुद्ध उघडले विजयाचे खाते, स्म्रीतीच्या धुव्वादार अर्धशतकाने सामना खिशात
‘या’ १८ वर्षीय पठ्ठ्याचा टी२० विश्वचषकात धुमाकूळ, रोहित-विराटला मागे सोडत विश्वविक्रमांची घातली रास