INDvsAUS ODI Series: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेनंतर आता 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. टी20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर दुसरा सामना यजमानांनी, तर तिसरा पाहुण्या भारतीय संघाने जिंकला. अशाप्रकारे मालिका 1-1ने बरोबरीत सुटली. आता वनडे मालिकेसाठी उभय संघ सज्ज झाले आहेत. या मालिकेत अनेक नवीन खेळाडू दिसणार आहेत. रिंकू सिंग याच्यासारख्या युवा खेळाडूंना पहिल्यांदा वनडे संघात जागा मिळाली आहे. तसेच, केएल राहुल कर्णधार असणार आहे. वनडे विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ पहिल्यांदा वनडे सामना खेळण्यासाठी उतरेल.
दुसरीकडे टी20 मालिकेवेळी सामन्याच्या वेळेवरून खूपच गोंधळ उडाला होता. अशात चाहत्यांपुढे हा प्रश्न आहे की, वनडे मालिका किती वाजता सुरू होईल. खरं तर, भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या वेळेत साडे तीन तासांचे अंतर आहे. खास बाब अशी आहे की, पहिल्या सामन्याची वेळ ही अखेरच्या दोन सामन्यांपेक्षा वेगळी आहे. आता चाहते या मालिकेची वेळ जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक असतील. तसेच, या सामन्यांची लाईव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्ट कुठे पाहता येईल, याचीही माहिती जाणून घेऊयात…
कुठे, कधी आणि कसे पाहता येतील लाईव्ह सामने?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेला रविवारपासून (दि. 17 डिसेंबर) सुरुवात होत आहे. मालिकेतील तिन्ही सामन्यांचे प्रसारण टीव्हीवर चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. तसेच, जर डिज्नी प्लस हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन असेल, तर तुम्ही ओटीटीवरही सामना पाहू शकता.
वनडे मालिकेचे वेळापत्रक
पहिला वनडे सामना- 17 डिसेंबर, जोहान्सबर्ग (दुपारी- 1.30 वाजता)
दुसरा वनडे सामना- 19 डिसेंबर, केबेरहा (सायंकाळी- 4.30 वाजता)
तिसरा वनडे सामना- 21 डिसेंबर, पार्ल (सायंकाळी- 4.30 वाजता)
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वाशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, दीपक चाहर (ind vs sa odi series live streaming schedule match timings and full squad know here)
हेही वाचा-
हार्दिकच्या ‘या’ अटीपुढे मुंबई इंडियन्सने टेकले गुडघे, मजबुरीने करावा लागला रोहितचा पत्ता कट; जाणून घ्याच
रोहितला कर्णधार पदावरून काढल्याचं सर्वाधिक दु:ख धोनीच्या चेन्नईला, पोस्ट चर्चेत