भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना आज रविवार (10 नोव्हेंबर) होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर संजू सॅमसनला इतिहास रचण्याची संधी आहे. जर सॅमसनने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 मध्ये शतक झळकावले, तर टी20 मध्ये शतकांची हॅट्ट्रिक करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरेल. याआधी सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी20 आणि बांग्लादेशविरुद्धच्या घरच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात शतक झळकावले होते.
टी20 क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत फक्त चार फलंदाज आहेत. ज्यांनी दोन टी20 सामन्यांमध्ये बॅक टू बॅक टू बॅक शतके झळकावली आहेत. संजू सॅमसन व्यतिरिक्त, या यादीत फ्रान्सचा गुस्ताव्ह मॅकेन, दक्षिण आफ्रिकेचा रिले रॉसो आणि इंग्लंडचा फिल सॉल्ट यांचा समावेश आहे. परंतु आजपर्यंत कोणत्याही फलंदाजाने टी20 मध्ये शतकांची हॅट्ट्रिक केलेली नाही.
2015 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा संजू सॅमसन नियमित संधी न मिळाल्याने संघात स्थान मिळवू शकला नाही. त्याचबरोबर संधी मिळाल्यावर तो आपली क्षमता सिद्ध करू शकला नाही. अशा परिस्थितीत जेव्हा नवा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवने संजू सॅमसनला 7 सामन्यांचे आश्वासन दिले. तेव्हा या खेळाडूचे नशीब उजळले. सॅमसनने खुलासा केला की, सूर्यकुमार यादवने दुलीप ट्रॉफीच्या वेळीच त्याला सांगितले होते की, त्याची कामगिरी काहीही असली तरी तो त्याला पुढील 7 सामन्यांमध्ये संधी देणार आहे.
बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या दोन टी20 मध्ये सॅमसनला काही आश्चर्यकारक दाखवता आले नाही. मात्र शेवटच्या टी20 मध्ये त्याने शतक झळकावले. आता दक्षिण आफ्रिका दौरा त्याच्या कारकिर्दीसाठी खूप महत्त्वाचा बनला आहे. त्याने पहिल्या टी20 मध्ये शतक झळकावले आहे. जर त्याने पुढील तीनपैकी दोन सामन्यात 50 पेक्षा जास्त धावा केल्या तर तो सलामीच्या स्थानावर आपले स्थान निश्चित करू शकतो.
हेही वाचा-
टीम इंडियाला सुधारावी लागणार ही मोठी चूक, अन्यथा दुसऱ्या टी20 मध्ये पराभव अटळ
मेगा लिलावापूर्वी इंग्लिश खेळाडूचे शानदार शतक, टी20 मध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज
नीरज चोप्राचा मोठा निर्णय, तीन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियनला बनवले प्रशिक्षक