दक्षिण आफ्रिका संघ भारतीय दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिका संघ भारताविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात पावसामुळे एकही चेंडू टाकता आला नाही आणि सामना रद्द झाला.
त्याचबरोबर आता या मालिकेतील पुढील 2 सामने 15 मार्च आणि 18 मार्चला खेळण्यात येणार आहेत. यामध्ये 15 मार्चला लखनऊ (Lucknow) येथे दुसरा सामना खेळण्यात येईल. तर 18 मार्चला मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना कोलकाता (Kolkata) येथे होणार आहे. हे दोन्ही सामने खेळण्यात येणार असले तरी या सामन्यांसाठी स्थानिक नागरिकांना मैदानावर जाऊन या सामन्याची मजा घेता येणार नाही.
खरं तर कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) बीसीसीआयला (BCCI) सरकारकडूने सल्ला दिला आहे की दोन्ही सामने रिक्त स्टेडियममध्ये व्हायला हवेत.
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लोकांना वाचविण्यासाठी राज्य सरकार (State Government) असो किंवा भारत सरकार (Government of India) शक्य तितके योग्य पाऊले उचलत आहे. अशा परिस्थितीत भारत सरकारने बीसीसीआयला सल्ला दिला आहे की, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पुढील 2 सामने प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत आयोजित केले जावे.
बीसीसीआयकडे सरकारचा हा निर्णय मान्य करण्याव्यतिरिक्त इतर कोणताही पर्याय नाही. कारण कोरोना व्हायरसला जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक साथीचा रोग घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या व्हायरसपासून लोकांना वाचण्यासाठी अशाप्रकारचे उपाय करण्यात येत आहेत.
याखेरीज क्रीडा मंत्रालयाने देशातील सर्व स्पोर्ट्स फेडरेशन आणि बीसीसीआय यांना सांगितले आहे, की आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांकडे लक्ष द्या. तसेच क्रीडा स्पर्धेदरम्यान मोठ्या संख्येने लोकांना एका ठिकाणी जमण्यापासून थांबवा.
याव्यतिरिक्त वारंवार सूचना देण्यात येत आहेत की, कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन काम केले पाहिजे.
महत्त्वाच्या बातम्या-
–आता हात धुतलेल्या प्रेक्षकांनाच मिळणार टीम इंडियाच्या सामन्याला संधी
–कॅप्टन कूल धोनीच्या 75 वर्षीय कूल चाहतीचा हा फोटो होतोय जोरदार व्हायरल






