आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे (ICC Champions Trophy 2025) यजमानपद पाकिस्तानकडे आहे. यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 8 संघ सहभागी होतील. या स्पर्धेसाठी आतापर्यंत 6 देशांच्या संघांची घोषणा करण्यात आली आहे. पण कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तानने अद्याप आपला संघ जाहीर केलेला नाही. चॅम्पियन्स ट्राॅफीची सुरूवात (19 फेब्रुवारी) पासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वप्रथम इंग्लंडने, यानंतर बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानने आपले संघ जाहीर केले.
आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी संघांचे स्क्वाड-
बांगलादेश- नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), सौम्य सरकार, तन्जीद हसन, तौहीद हृदय, मुशफिकुर रहीम, एमडी महमुदुल्लाह, जाकीर अली अनिक, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, परवेझ हुसेन इमोन, नसुम अहमद, तन्झीम हसन साकिब, नाहिद राणा
न्यूझीलंड- मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, विल ओ’रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, बेन सीयर्स, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग
अफगाणिस्तान- हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झदरान, रहमानउल्लाह गुरबाज, सेदिकुल्लाह अटल, रहमत शाह, इकराम अलीखिल, गुलबदिन नायब, अझमतुल्लाह उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, एएम गझनफर, नूर अहमद, फजलहक फारुकी, फरीद मलिक, नवीद झदरान
इंग्लंड- जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल साल्ट, मार्क वूड
ऑस्ट्रेलिया- पॅट कमिन्स (कर्णधार), अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, आरोन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टाॅयनिस, अॅडम झाम्पा
दक्षिण आफ्रिका- तेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, मार्को जान्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्करम, डेव्हिड मिलर, वियान मुल्डर, लुंगी एनगिडी, अँरिक नाॅर्खिया, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रास्सी व्हॅन डेर ड्यूसेन
महत्त्वाच्या बातम्या-
माजी दिग्गजाने सांगितली विराटला फाॅर्ममध्ये आणण्याची ट्रिक! म्हणाला, “त्याला सांगा पाकिस्तानविरूद्ध…”
पंजाबच्या कर्णधाराची घोषणा झाली, आता RCB-KKR बाकी! पाहा कर्णधारांची यादी
“त्यांचे भविष्य त्यांना स्वतः ठरवू द्या” रोहित-विराटच्या निवृत्तीबाबत महान क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य