माजी कर्णधार सलमान बट याने कसोटी क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तुलनेवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघ पाकिस्तानपेक्षा खूप पुढे असल्याचे त्यानी म्हटले आहे. सलमान बटच्या मते, पाकिस्तान आणि भारताची तुलना होऊ शकत नाही कारण भारतीय संघ आपल्या घरच्या मैदानावर सर्व सामने जिंकतो, तर पाकिस्तान संघ आपल्या घरच्या मैदानावरही हरतो.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. भारतीय संघाची गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही फ्लॉप ठरल्या. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता.
सलमान बट (Salman Butt) याच्या म्हणण्यानुसार, दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघ हरला असला तरी ते त्यांच्या घरच्या मैदानावर सर्व सामने जिंकतात. तर पाकिस्तान संघ आपल्या घरच्या मैदानावरही कसोटी सामना हरतो. त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सलमान बट म्हणाला, “दक्षिण आफ्रिकेत भारताला नेहमीच अडचणी येत आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियात मालिका जिंकली पण दक्षिण आफ्रिकेत ते कधीच चांगल्या फॉर्ममध्ये दिसले नाहीत. मात्र, असे असूनही पाकिस्तानची तुलना भारतीय संघाशी होऊ शकत नाही. भारतीय संघ किमान घरच्या मैदानावर सर्व कसोटी सामने जिंकते तर आम्ही आमच्या घरच्या मैदानावरही हरतो. दोन्ही संघांमध्ये तुलना नाही. पण पाकिस्तानने ऑस्ट्रेलियात एकही मालिका जिंकलेली नाही, तर भारताने दोनदा ही कामगिरी केली आहे. भारताने इंग्लंडमध्येही चांगले क्रिकेट खेळले आहे.”
माागील मालिकेत पाकिस्तान संघाला आपल्या घरच्या मैदानावर इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. (Indian team is far ahead of Pakistan in Test cricket the statement of former Pakistan captain)
हेही वाचा
पॅरिस ऑलिंपिकमध्ये शूटिंगच्या मिक्स इव्हेंटमध्ये नक्कीच पदकाची अपेक्षा – खेलरत्न पुरस्कार विजेती अंजली भागवत
टीम इंडियाकडून नव्या वर्षाची जबरदस्त सुरुवात! सिराजच्या ‘फाईव्ह विकेट हॉल’मुळे दक्षिण आफ्रिका 55 धावांवर ऑलआऊट