जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये भारत आणि पाकिस्तान संघांचा समावेश होतो. भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामन्याला स्टेडिअममध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. अनेकदा चालू सामन्यात खेळाडूंमधील बाचाबाचीमुळे वातावरणही तापते. हे दोन्ही संघ आयसीसी स्पर्धांमध्येच खेळताना दिसतात. याव्यतिरिक्त पाकिस्तान संघाचे माजी खेळाडू नेहमीच भारतीय संघाविरुद्ध गरळ ओकत असतात. आता पुन्हा एकदा पाकिस्तानचा माजी खेळाडू दानिश कनेरिया याने तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
दानिश कनेरिया (Danish Kaneria) याने भारतीय संघाच्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठीच्या तयारीवरून भाष्य केले आहे. तो म्हणाला आहे की, भारतीय संघ ज्याप्रकारे ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका हारला, ते पाहता म्हटले जाऊ शकते की, ते सध्या विश्वचषकासाठी तयार नाहीत.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताला 1-2ने पराभवाचा सामना करावा लागला. भारताने हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वात पहिला सामना जिंकला होता. मात्र, त्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली भारताने पुढील दोन्ही सामने गमावले. या पराभवानंतर भारतीय संघावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
‘भारतीय संघापुढे अनेक समस्या’
पाकिस्तानचा माजी खेळाडू दानिश कनेरियाने भारतीय संघाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, संघ अद्याप विश्वचषकासाठी तयार नाही. त्याने युट्यूब चॅनेलवर बोलताना कनेरिया म्हणाला की, “विराट कोहलीने फॉर्ममध्ये येण्यासाठी खूप वेळ घेतला. मात्र, संघात त्यावेळी जास्त बदल झाला नाही. कारण, विराटचा विषय होता. सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांना तुम्ही का वाया घालवत आहात? श्रेयस अय्यरची फिटनेस सर्वात मोठी समस्या आहे. विश्वचषकापर्यंत तो फिट होणार की नाही, याबाबत काही बोलले जाऊ शकत नाही. भारतीय संघ त्यांच्या घरात विश्वचषक खेळेल. मात्र, ते अद्याप तयार नाहीत. भारताने खूपच खराब क्रिकेट खेळले.”
खरं तर, भारतीय संघासाठी वनडे मालिकेत फलंदाजी हा चिंतेचा विषय राहिला आहे. संघातील अनेक फलंदाज फ्लॉप ठरत आहेत. त्याचा परिणाम त्यांना सहन करावा लागला. सूर्यकुमार यादव तिन्ही वनडेत पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. आता 31 मार्चपासून आयपीएल 2023 स्पर्धेला सुरुवात होत आहे. यामध्ये खेळाडू कशी कामगिरी करतात, त्यावर सर्वांचे लक्ष असणार आहे. (india are not ready for world cup says pakistani former crickerer danish kaneria)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर घटस्फोटावर शिखरने सोडले मौन! म्हणाला, “व्यक्ती ओळखण्यात चूक झाली”
“मी खेळाडूंना शिकवण्यास तयार होतो, द्रविडने मनाई केली”, दिग्गजाचा खळबळजनक खुलासा