भारतीय क्रिकेट संघ आता दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ कोणत्याही प्रकारचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नाही. भारताचे सर्व प्रमुख खेळाडू यादरम्यान आयपीएलच्या आगामी हंगामात खेळताना दिसतील. या दरम्यानच आता भारताचे माजी दिग्गज फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी एक असा खुलासा केला आहे, ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव याने एका जबरदस्त चेंडूवर ऍलेक्स केरीचा त्रिफळा उडवला. तो व्हिडिओ ट्विट करत एका चाहत्याने म्हटले,
‘मला वाटते की कुलदीपने या सामन्यात योग्य क्षेत्ररक्षण लावून गोलंदाजी केली नाही. ऑस्ट्रेलियासाठी जेव्हा ऍडम झंपा व एगर गोलंदाजी करत होते तेव्हा स्मिथने अगदी आक्रमक क्षेत्ररक्षण लावलेले दिसले. अशावेळी तुम्हाला लक्ष्मण शिवरामकृष्णन यांच्यासारख्या तज्ञाची गरज भासते.’
I offered my services to Rahul Dravid and he said that I was too senior to him ,to be working under him-with the spinners .
— Laxman Sivaramakrishnan (@LaxmanSivarama1) March 22, 2023
या ट्विटला उत्तर देताना शिवरामकृष्णन यांनी लिहिले,
‘मी भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड याला युवा फिरकीपटूंना मार्गदर्शन करण्याविषयी बोललो होतो. मात्र, त्याने अगदी नम्रतापूर्वक म्हटले की, तुम्ही खूप सीनियर आहात. माझ्यापेक्षा खालच्या पदावर काम करताना हे योग्य दिसणार नाही.’
भारतीय संघाने या वनडे मालिकेमध्ये पहिला सामना जिंकल्यानंतर ही मालिका गमावली. असे असले तरी सध्या भारताचे फिरकी गोलंदाज उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा व अक्षर पटेल हे सातत्याने विरोधी फलंदाजांना अडचणीत टाकतात. तर, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कुलदीप यादव, चहल, रवी बिश्नोई वॉशिंग्टन सुंदर असे अनेक पर्याय भारतीय संघाकडे आहेत.
(Laxman Sivaramakrishnan Said I Offered As Spin Bowling Consultantant But Rahul Dravid Denied)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WPL फायनलमध्ये रंगणार कर्णधारांचे युद्ध! हरमन बदला घेणार की लॅनिंग हॅट्रिक साधणार?
नंबर वन यारी! रिषभला भेटण्यासाठी पोहोचले भारतीय दिग्गज, म्हणाले, ‘फिनिक्स पक्षासारखी भरारी घे’