---Advertisement---

टी२० क्रमवारीत केएल राहुलला मोठा फायदा, पोहचला दुसऱ्या स्थानी; तर विराट कोहली ‘या’ क्रमांकावर

---Advertisement---

नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका विरूद्ध पाकिस्तान यांच्यातील टी -२० मालिकेत पाकिस्तान संघाने २-१ ने मालिका जिंकली आहे. ही, टी -२० मालिका संपल्यानंतर आयसीसीने टी -२० क्रमवारी जाहीर केली आहे. यात दक्षिण आफ्रिका संघाकडून सर्वाधिक ६ बळी घेणाऱ्या तबरेझ शम्सी याने चांगल्याच गुणांची कमाई केली आहे.

केएल राहुलला फायदा 

आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलला १ स्थानाचा फायदा झाला आहे. तो तिसऱ्या क्रमांकावरुन दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तर विराट कोहली सातव्या क्रमांकावर कायम आहे. फलंदाजांच्या यादीत पहिल्या दहा फलंदाजांमध्ये केएल राहुल आणि विराट हे दोघेच भारतीय क्रिकेटपटू आहेत.

शम्सीने मिळवले कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान 

पाकिस्तान विरूद्ध झालेल्या टी -२० मालिकेत ६ गडी बाद करणारा दक्षिण आफ्रिका संघाचा फिरकी गोलंदाज तबरेज शम्सी याने आयसीसी क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान मिळवले आहे. त्यानं गोलंदाजांच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे.

तसेच पाकिस्तान संघाचा आक्रमक यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान हा देखील आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत आहे. त्याने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध ३ सामन्यात १९७ धावा केल्या आहेत. यात १ शतकाचा ही समावेश आहे. याच कामगिरीच्या जोरावर तो आयसीसी टी-२० फलंदाजाच्या क्रमवारीत ४२ व्या स्थानावर पोहोचला आहे.

संघक्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानी –

तसेच या मालिकेनंतर आयसीसीने टी-२० संघ क्रमवारी देखील घोषित केली असून पाकिस्तान संघ ४ थ्या क्रमांकावर टिकून आहे तर दक्षिण आफ्रिका संघ ५ व्या क्रमांकावर आहे. तसेच पहिल्या तीन क्रमांकावर अनुक्रमे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

आर अश्विनने त्याच्या विक्रमी शतकाचं श्रेय दिलं टीम इंडियातील ‘या’ व्यक्तीला

आयपीएल २०२१ पूर्वी पंजाबच्या संघाने घेतला मोठा निर्णय, करणार ‘हा’ महत्वपूर्ण बदल

भारत-इंग्लंड संघातील दुसऱ्या कसोटीमुळे ‘या’ दोन माजी दिग्गजांमध्येच जुंपले ट्विटर वॉर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---