मिरपूरच्या शेर ए बांगला क्रिकेट स्टेडियमवर रविवारी (9 जुलै) बांगलादेश आणि भारत महिला क्रिकेट संघ आमने सामने होते. दोन्ही संघांमधील हा सामना कमी धावसंख्येचा राहिला. भारताने हा सामना 7 विकेट्स राखून नावावर केला. कर्णधार हरमनप्रीत कौर या विजयात सर्वात महत्वाचे योगदान देऊ शकली. भारतीय संघाला आपल्या मनाप्रामाणे बांगलादेश दौऱ्याची सुरुवात गोड करता आली.
हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने नाणेफेक जिंकून यजमान बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 विकेट्सच्या नुकसानावर 114 धावा केल्या. विजयासाठी भारताला 115 धावांचे आव्हान होते, ज्या संघाने 16.2 षटकांमध्ये आणि 3 विकेट्सच्या नुकसानावर गाठले. यात हरमनप्रीतने अर्धशतकाचे योगदान दिले. हरमनप्रीतने 35 चेंडूत 54 धावांची खेळी केली. हरमनप्रीतच्या आधी सलामीवीर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने 38 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. पण अर्धशतक पूर्ण करण्याआधीच स्मृतीने सुलताना खातून हिच्या चेंडूवर यष्टीरक्षक निगर सुलतान हिच्या हातात झेल दिला.
भारतासाठी डावाची सुरुवात करायला आलेली शेफाली वर्मा (Shefali Varma) एकही धाव करू शकली नाही. तिने 3 चेंडू खेळल्यानंतर शुन्य धावसंख्येवर मारुफ अख्तरला विकेट दिली. जेमिमाह रॉड्रिग्ज हिने 14 चेंडूत 11 धावा केल्या आणि सुलताना खातूनला विकेट दिली. हरमनप्रीतच्या साथीने यष्टीरक्षक यास्तिका भाटिया शेवटपर्यंत नाबाद राहिले. यास्तिकाने 12 चेंडूत 9* धावा केल्या. गोलंदाजी आक्रमानत पूजा वस्त्राकर, मिन्नू मणी आणि शेफाली वर्मा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
तत्पूर्वी बांगलादेश संघासाठी त्यांची एकही फलंदाज अर्धशतक करू शकली नाही. बांगलादेशच्या फलंदाज संथगतीने खेळताना दिसत होत्या, ज्यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. शोर्णा अख्तर हिने या सामन्यात सर्वाधिक 28 धावांची खेली आपल्या संघासाठी केली. बांगलादेशसाठी गोलंदाजी आक्रमातील सुलताना खातूनने दोन, तर मारूफ अख्तरने एक विकेट घेतली. (India beat Bangladesh by 7 wickets in first T20I)
महत्वाच्या बातम्या –
दुसऱ्या पीवायसी रावेतकर फुटबॉल लीग स्पर्धेत 14 वर्षाखालील गटात गार्डीयन संघाला विजेतेपद
जेव्हा धोनी माजी क्रिकेटपटूच्या पत्नीला म्हणालेला, ‘वहिनी मला फक्त 30 लाख कमवायचे आहेत, कारण…’